esakal | लोकलमधून बॅग चोरण्यासाठी 'ते' काढत होते तीन महिन्यांचा पास!
sakal

बोलून बातमी शोधा

लोकलमधून बॅग चोरण्यासाठी 'ते' काढत होते तीन महिन्यांचा पास!

लोकलमधून बॅग चोरण्यासाठी 'ते' काढत होते तीन महिन्यांचा पास!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गर्दीच्या वेळेत लोकलमधून प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या चौघांच्या टोळीला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ग्यानसिंग कुशवाह, राजकुमार कुशवाह, श्रीकांत साबळे ऊर्फ लंबू आणि करीम पाचू मियाँ अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, या चोरट्यांनी गुन्हे करण्यासाठी तीन महिन्यांचा पास काढल्याचे समोर आले आहे.

आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचारी नेमावेत

मूळ राजस्थानमधील रहिवासी असलेले ग्यानसिंह आणि राजकुमार हे कुशवाह बंधू मुंबईतील साथीदारांच्या मदतीने लोकल प्रवाशांच्या बॅगा चोरी करून त्यांची राजस्थानमध्ये विक्री करत असल्याचे उघड झाले. बॅगचोरीच्या गुन्ह्यात तपास करताना वडाळा रेल्वे पोलिसांनी २७ जानेवारीला ग्यानसिंगला बेड्या ठोकल्या होत्या. चौकशीत त्याने भाऊ राजकुमार आणि श्रीकांत यांच्या मदतीने चोऱ्या करत असल्याचे सांगितले. 

हॉटलांसाठी अग्निसुरक्षा अध्यादेश आहे का?

लॅपटॉप, मोबाईल जप्त
पोलिसांनी या टोळीकडून आधी दोन लाख ३८ हजार रुपये किमतीचे आठ लॅपटॉप ताब्यात घेतले. त्यानंतर तीन लाख २४ हजार रुपये किमतीचे आणखी नऊ लॅपटॉप जप्त करण्यात आले. त्याचप्रमाणे ८६ हजारांचा आयपॉड आणि मोबाईल फोन जप्त केले.

असे हेरायचे सावज
गर्दीच्या वेळी लोकलमध्ये घुसून कोणत्या प्रवाशाच्या बॅगेत काय असेल, याचा अंदाज घ्यायचा. लॅपटॉप, मोबाईल आदी मौल्यवान वस्तू असलेली बॅग हेरायची. त्यानंतर टोळीतील एकाने ती बॅग लोकलमधील रॅकमधून काढायची आणि दुसऱ्याने घेऊन धूम ठोकायची, अशी त्यांची कार्यपद्धती होती.