Valentine Day : व्हॅलेंटाईनसाठी आहे 'या' गॅजेट्‌सना आहे तुफान मागणी 

Valentine Day : व्हॅलेंटाईनसाठी आहे 'या' गॅजेट्‌सना आहे तुफान मागणी 

नवी मुंबई : व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी गुलाबाची फुले वा भेटवस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे स्वरूप बदलत चालले आहे. सध्याची पिढी तंत्रज्ञान साक्षर असल्याने भेटवस्तू देण्यासाठी गॅजेट्‌सचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. 

व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमात असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक प्रकारे उत्सव असतो. केवळ जोडप्यांसाठी असलेल्या या दिवसाची कालांतराने जशी व्याख्या बदलू लागली, तशी आपल्या जोडीदाराला भेटवस्तू देण्याची संकल्पनाही बदलल्या. लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानले जात असल्याने हमखास एखादे गुलाब वा पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला जायचा. त्याबरोबरच भेटकार्ड, लाल रंगाचे फुगे, हदयाच्या आकाराच्या उशा, सॉफ्ट टॉय किंवा टेडी बेअर, अंगठी अशा प्रकारच्या भेटवस्तूंची देवाण-घेवाण व्हायची. मात्र, आता या गोष्टींची जागा गॅजेट्‌सने घेतली आहे.

भेटवस्तू हे तात्पुरते असण्यापेक्षा किमान वापरता येण्याजोगे असावे, या विचाराने आधुनिक हेडफोन्स (श्रवणध्वनी यंत्र), वायरलेस हेडफोन्स, घड्याळे, एअरपॉडस, आयपॅड, कींडल, सारेगम कारवा वायरलेस ध्वनिक्षेपक, अत्याधुनिक कॅमेरा अशा गॅजेट्‌सना पसंती दिली जात आहे. ऑनलाईनही सवलतीच्या दरात अशी भेटवस्तू मागवली जात असून, ऑफलाईन म्हणजेच दुकानात जाऊन पाहून पडताळून खात्री करून गॅजेट्‌सची खरेदी होत आहे. 

हल्ली प्रेमाचा आठवडा साजरा होत असल्याने आठवडाभर फुलांची आणि छोट्या-मोठ्या भेटवस्तूंची उधळण होत असते. आता तरुणाई तंत्रज्ञानवेडी झाली असल्याने गॅजेट्‌सनाही भेटवस्तू म्हणून पसंती दिली जात आहे. माझ्याकडे हेडफोन, स्मार्ट वॉचची मागणी अधिक होती. काही ज्येष्ठ ग्राहकांनी सरेगम कारवा स्पीकर, किडल यासारखी गॅजेट्‌स घेतली.  - इमरान मिरझा, ए. एस. एंटरप्रायजेस. 

तरुणांनी या वेळी 5 ते 16 हजार रुपयांच्या किमतीतील मोबाईलची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली. त्याबरोबरच छोट्या-मोठ्या गॅजेटचीही विक्री झाली.  - दिनेश कुमार, गॅजेट किंग  

these gadgets are in demand for valentines day check full list


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com