#RepublicDay2020 : 'हे' पाकिस्तानी नेते होते भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी..

#RepublicDay2020 : 'हे' पाकिस्तानी नेते होते भारतीय प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी..

मुंबई - आज भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिवस आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्राझीलचे राष्ट्रपती 'जेर मेस्सियास बोल्सोनारो' यांनी हजेरी लावली. गेल्या काही वर्षातील प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांबद्दल तुम्हा आम्हाला ठाऊक आहेच. मात्र तुम्हाला पहिल्या दहा प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्यांबद्दल ठाऊक आहे का ?    

सुरवातीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडची विशिष्ठ जागा निश्चित नव्हती. अशात प्रजासत्ताक दिन परेड हि लाल किल्ला, रामलीला मैदान, किंग्सवे, इरविन स्टेडियम अशा वेगवेगळ्या जागांवर झाली आहे. १९५५ नंतर परेडची जागा निश्चित केली गेली आणि त्यांचं आयोजन हे राजपथावर केलं जातं. 

सुरवातीपासूनच भारत आपल्या शेजारील देशातील प्रमुख राजकीय नेत्यांना परेडसाठी आमंत्रित करत आलाय. मात्र काही अशीही वर्ष होती जेंव्हा प्रमुख अतिथी म्हणून कुणीही उपस्थित नव्हतं. 1952, 1953, 1956, 1957, 1959, 1962, 1964, 1966, 1967 आणि 1970 मध्ये पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कुणीही प्रमुख अतिथी नव्हते. 

1955 - पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल गुलाम मोहम्मद 

1955 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल गुलाम मोहम्मद हे प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. राजपथावर घेण्यात येणाऱ्या परेडपैकी पहिल्या परेडचे ते मुख्य अतिथी होते. भारत पाकिस्तान तणाव आधीपासूनच आहे. अशातही पाकिस्तान हा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होत आलाय.  

1958 - चीनचे मार्शल के  जियानयिंग

1956 आणि 1957 या दोन वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी कुणीही मुख्य अतिथी म्हणून उपस्थित नव्हतं. त्यानंतर भारताचा शेजारी चीन चे मार्शल 'ये जियानयिंग'  यांना भारताने प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलं होतं. त्यावेळी भारत आणि चीनमध्ये तणाव होता. तरीही जवाहरलाल नेहरू यांनी चीनचे मार्शल 'के  जियानयिंग' यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलं होतं. 

 1960 - सोव्हियत संघाचे अध्यक्ष क्लेमेंट वॉरोशिलोव्ह 

1959 या वर्षी देखील भारताच्या प्रजासत्ताक दिनाला कुणीही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित नव्हतं. त्यानंतर 1960 साली म्हणजेच भारताच्या दहाव्या प्रजासत्ताक दिनाला भारतने सोव्हियत संघाचे तत्कालीन अध्यक्ष क्लेमेंट वॉरोशिलोव्ह यांना आमंत्रित केलं होतं. 

1961 - ब्रिटनची राणी एलिझाबेथ (II) 

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताने कधीही ब्रिटनला आमंत्रित केलं नव्हतं. 1961 मध्ये भारताने पहिल्यांदा ब्रिटनच्या राणीला भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलं होतं. 

1963 - कंबोडियाचे राजा  'नॉरोडॉम सिहनोक'  

1962 मध्ये पुन्हा एकदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाला कुणीही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित नव्हतं. यानंतर १९६३ मध्ये भारताने पहिल्यांदाच कंबोडियाचे राजा 'नॉरोडॉम सिहनोक' यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलं होतं. 

1965 - पाकिस्तानचे  अन्न आणि कृषी मंत्री राणा अब्दुल हमीद 

1964 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिन परेडला कुणीही प्रमुख पाहुणे म्हणून हजर नव्हते. यानंतर 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्धहोण्याआधी पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानचे अन्न आणि कृषी मंत्री राणा अब्दुल हमीद याना आमंत्रित केलं होतं. 

1968 - एकाच वर्षी दोन मुख्य अतिथी 

1966 आणि 1967 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला कुणीही प्रमुख अतिथी नव्हते. त्यानंतर १९६८ मध्ये भारताने दोन प्रमुख अतिथींना आमंत्रित केलं होतं. यामध्ये सोव्हियत संघाचे अध्यक्ष 'एलेक्सेई कोश्यगिन' आणि योगोस्लाव्हियाचे तत्कालीन राष्ट्रपती 'जोसिप ब्रोज टीटो' यांना आमंत्रित केलं होतं  

1969 -  बुल्गारियाचे पंतप्रधान 'टॉड झिव्हकोव्ह' 

असे अनेक देश आहेत ज्यांना अनेकदा प्रजासत्ताक दिनाचे प्रामुख अतिथी म्हणून आमंत्रित केलं गेलंय. मात्र  १९६९ मध्ये पहिल्यांदाच भारताने बाल्कनमधील नेत्याला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलं. मात्र  बुल्गारियाचे तत्कालीन पंतप्रधान 'टॉड झिव्हकोव्ह' हे बाल्कन देशातील आतापर्यंतचे एकुलते एक मुख्य अतिथी राहिलेत. 

1971 - टांझानिया चे राष्ट्रपती 'ज्युलियस न्येरे' 

पुन्हा 1970 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडला कुणीच मुख्य अतिथी नव्हते. त्यानंतर 1971 मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाचे नववे मुख्य अतिथी म्हणून टांझानियाचे राष्ट्रपती 'ज्युलियस न्येरे' यांना आमंत्रित केलं होतं.  बुल्गारियासारखंच टांझानियाला देखील केवळ एकदाच आमंत्रित केलं गेलंय.  

1972​ - मॉरीशसचे पंतप्रधान 'सीवुसगुर रामगुलाम' 

1972 मध्ये पहिल्यांदाच भारताने मॉरीशसला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आमंत्रित केलं. 1972 मध्ये मॉरीशस चे पंतप्रधान 'सीवुसगुर रामगुलाम'हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी राहिलेत.  त्यानंतर 1990 आणि 2002 मध्ये भारताने पुन्हा मॉरीशसला प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आमंत्रित केलं होतं. 

these pakistani leaders came as chief guest of republic day parade of india

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com