#RepublicDay2020 : कोण आहेत प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे 'जेर मेस्सियास बोल्सोनारो'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

मुंबई - आज भारताचा प्रजासत्ताक दिन. मुंबईत शिवाजीपार्कवर तर दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त खास परेडचं आयोजन करण्यात येतं. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी देशभरातून हजारो नागरिक येत असतात. या आधी देखील दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर पाहुणे आले आहेत. यामध्ये बाराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आदींची नाव आहेत. दरम्यान,  यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो.

मुंबई - आज भारताचा प्रजासत्ताक दिन. मुंबईत शिवाजीपार्कवर तर दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त खास परेडचं आयोजन करण्यात येतं. राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी देशभरातून हजारो नागरिक येत असतात. या आधी देखील दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर पाहुणे आले आहेत. यामध्ये बाराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प आदींची नाव आहेत. दरम्यान,  यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो. स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोल्सेनारो यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं.

मोठी बातमी - शरद पवारांची काम करण्याची 'ती' पद्धत आहे, संजय राऊतांनी सांगितला भन्नाट किस्सा.. 

एक नजर टाकुयात अध्यक्ष जेर मेस्सियास यांच्या कारकिर्दीवर  : 

  • ब्राझीलचे अध्यक्ष जेर मेस्सियास बोल्सोनारो यांनी २०१८ मध्ये ब्राझीलमधील राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक जिंकली. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला  
  • ब्राझीलमधील डाव्या विचारसरणीच्या सरकारला हटवत बोल्सनरो सत्तेत आलेत, म्हणून देखील भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांना दिल्या गेलेल्या निमंत्रणावरून वाद देखील झाला 
  • ब्राझीलचे अध्यक्ष आपल्या वैयक्तिक मतांमुळेदेखील अनेकदा वादात राहिलेत 
  • महिला आणि LGBT वरील त्यांची मतं अनेकांना पटत नाहीत 
  • त्यांनी ब्राझीलच्या संसदेतील विरोधीपक्ष नेत्या 'मारिया डो रोजारियो' यांच्यावर ' मी तुझा रेप करणार नाही कारण, तू त्याच्या लायकीची नाही' असं विवादास्पद भाष्य केलेलं. यानंतर त्यांनी माफी देखील मागितली.  

मोठी बातमी - बाळासाहेब ठाकरे कुणाचे? 'शिवसेना-मनसे'त बाळासाहेबांवरून वादंग..

  • राष्ट्रपती निवडणुकांवेळी त्यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. प्रचारावेळी त्यांच्या पोटात चाकू खुपसला गेला होता
  • २००२ मध्ये ब्राझीलचे तत्कालीन राष्ट्रपती  'फर्नेंडो कारडोसो' हे 'गे राईट्स' साठी लढा देत होते. यामध्ये सामील होण्यास बोल्सनरो यांनी विरोध केला.  
  • मी दोन पुरुषांना चुंबन घेताना पाहिलं तर मी त्यांना तिथेच चोप देईन, असं देखील बोल्सनारो म्हणाले होते. 
  • बोल्सोनारो यांच्या विरोधातील आणखी एक बाब म्हणजे ऊस. भारत  साखर उत्पादन करणारा मोठा देश आहे . ब्राझील देखील मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन करतो. अनेकदा ब्राझीलने वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशनमध्ये भारताविरोधात आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांविरोधात गरळ ओकली आहे.  
  • ऍमेझॉन जंगलात पसरलेल्या आलेला देखील बोल्सोनारो यांना कारणीभूत ठरवलं गेलं होतं 

ब्राझीलच्या निमित्ताने दक्षिण अमेरिका खंडातील देशांशी संबंध वृद्धिंगत करण्यास भारताने प्राधान्य दिले असून, त्या अंतर्गत ब्राझीलच्या अध्यक्षांना प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे.

मोठी बातमी - महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या नादाला लागायचं नाही, मनसेचा सज्जड दम

त्यांच्यासमवेत येणाऱ्या शिष्टमंडळात सात मंत्री, तेथील संसदेतील ब्राझील-भारत मैत्री गटाचे प्रमुख तसेच अधिकारी आणि उद्योजकांचाही समावेश असेल. अध्यक्ष बोल्सेनारो २७ जानेवारीला भारतीय-ब्राझील उद्योजक मंचाच्या व्यासपीठावरून दोन्ही देशांच्या उद्योजकांशी संवादही साधतील.

ब्राझीलचे अध्यक्ष बोल्सेनारो यांचा भारत दौरा शुक्रवार म्हणजेच २४ जानेवारीपासून सुरु झालाय. बोल्सेनारो सोमवारी म्हणजेच  २७, जानेवारीला मायदेशी रवाना होणार आहेत. 

who is republic day chief guest jair messias bolsonaro detail profile and controversies 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: who is republic day chief guest jair messias bolsonaro detail profile and controversies