
मुंबई : खंडणी उकळण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची माहिती कुख्यात गुन्हेगार सुरेश पुजारी याला पुरवणाऱ्या रवींद्र पुजारी (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्याने हा मार्ग स्वीकारल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
२८५ बेघर मुलांची मध्य रेल्वेकडून घरवापसी
रवींद्र पुजारी याने तीन हॉटेल व्यावसायिकांची माहिती सुरेश पुजारी याला दिल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिक आणि त्याच्या भागीदारांकडे परदेशात वास्तव्य असलेला गुन्हेगार सुरेश पुजारी याने दिवाळीत ‘गुडलक’ म्हणून १० लाख रुपयांची मागणी केली. खंडणी देण्यासारखी आपली आर्थिक परिस्थिती नसल्याचे या हॉटेल व्यावसायिकांनी पुजारीला सांगितले; परंतु पुजारीने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. पुजारीकडून वारंवार धमक्या मिळत असल्याने त्यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली.
गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असता या हॉटेल व्यावसायिकांना धमकावल्याचे उघड झाले.
आता उद्धव रोखणार मोदींची बुलेट ट्रेन ?
पोलिस कोठडीत रवानगी
पोलिसांनी नवी मुंबई परिसरातून अटक केलल्या रवींद्र पुजारी याला न्यायालयाने २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. रवींद्र पुजारी डिसेंबर २०१८ पासून सुरेश पुजारी याच्या संपर्कात होता. त्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांची माहिती सुरेश पुजारीला पुरवल्याचे उघड झाले.