धारावीमध्ये 3 तर जी उत्तरमध्ये 29 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीमध्ये 3 तर जी उत्तरमध्ये 29 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

जी उत्तरमध्ये आज 29 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये आज दिवसभरात केवळ 3 नविन रूग्ण सापडले

धारावीमध्ये 3 तर जी उत्तरमध्ये 29 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई, ता. 12 : जी उत्तरमध्ये आज 29 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये आज दिवसभरात केवळ 3 नविन रूग्ण सापडले असून एकूण रूग्णसंख्या 3,611 इतकी झाली आहे. तर 47 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्त्वाची बातमी : पालिकेने केलं शुल्क माफ, मात्र पार्किंग ठेकेदारांकडून वाहन चालकांची पाकीटमारी सुरूच

 दादरमध्ये आज केवळ 17 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,431 इतकी झाली आहे. तर 137 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये ही आज केवळ 9 नवीन रुग्णांची भर पडली असून रुग्णांची संख्या 4,174 इतकी झाली आहे. तर 271  ऍक्टिव्ह रूग्ण आहेत.

महत्त्वाची बातमी : अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग

धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात आज 29 नविन रुग्णांची भर पडली असून रूग्णांचा एकूण आकडा 12,216 वर पोहोचला आहे. तर तिथे 455 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्त्वाची बातमी :  मुंबई विमानतळावर क्रिकेटर कृणाल पांड्याला DRI ने घेतलं ताब्यात, चौकशी सुरु!

जी उत्तरमध्ये आतापर्यंत 617 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,253,दादरमध्ये 4,125 तर माहीम मध्ये 3,761 असे एकूण 11,139 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

three new cases from dharavi and 29 from g north detected today

loading image
go to top