Atul-Bhatkhalkar
Atul-Bhatkhalkarsakal media

पंजाबमधील प्रकार, पटोलेंच्या वक्तव्याची चौकशी करा : अतुल भातखळकर

आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून समिती नेमण्याची मागणी

मुंबई : पंजाबमध्ये नुकत्याच पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत (Narendra modi security) घडलेल्या घटनेचा व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानाचा काही संबंध आहे का, याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme court) समितीने केली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. पटोले यांच्या विधानाविरोधात भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करून पटोले यांचा पुतळा जाळला. पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी तक्रारही भातखळकर यांनी समतानगर पोलिस ठाण्यात केली आहे. (Do investigation of nana patole statement and punjab narendra modi security breach)

Atul-Bhatkhalkar
पालघरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे - दादा भुसे

नाना पटोले यांनी सोमवारी (ता. १७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला. तरी आघाडी सरकारने याविरोधात पटोलेंवर कोणतीही कारवाई केली नाही, परंतु यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मात्र त्यांना अर्ध्या तासात अटक करण्यात आली.

त्यामुळे या राज्यात सत्ताधारींनी काहीही केले तरी त्यांना वेगळा न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय, अशा प्रकारची हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केली. पटोले यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी पोलिसांनी भातखळकर यांना अटक केली असता, विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार ठाकरे सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली. पटोलेंविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचेही भातखळकर यांनी संगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com