Corona Patient
Corona Patientsakal media

ठाण्यात ९०० जणांवर उपचार सुरू; ११,६९६ रुग्ण होम क्वारंटाईन

ठाणे : ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे (corona vaccination) कोरोनाची लागण (corona patients) झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना ऑक्सिजन अथवा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे दिसून येत आहे; तर केवळ व्याधीग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन आणि आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात सध्याच्या घडीला १२ हजार ६०६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ११ हजार ६९६ रुग्णांवर घरच्या घरीच उपचार करण्यात येत असून केवळ ९०० रुग्णांवरच कोविड केअर सेंटर (covid care center), डिस्ट्रिक्ट कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेट कोविड सेंटर आणि महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Corona Patient
यंदा किती नगरसेवक येतात पाहू; पेडणेकरांचं भाजपला थेट आव्हान

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आलेल्या ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसह कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढू लागला होता. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली होती. या वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने व राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने कंबर कसली. त्यानुसार जिल्ह्यात मुबलक ऑक्सिजनसाठा, पुरेशा प्रमाणात बेड्स तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेऊन लहान बालकांसाठी विशेष कक्ष आदी सोयीसुविधा उपलब्ध करीत सज्जता ठेवण्यात आली होती.

डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून कोरोनाचा वाढता संसर्ग नव्या वर्षात अधिक मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याचे दिसून आले. असे असले, तरी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेली लसीकरण मोहीम यामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत नव्हती; तर ज्या रुग्णांना आधी काही आजार असल्यास व त्यांना कोरोनाची झाल्यास अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येत होते. त्यात सध्या घडीला ठाणे जिल्ह्यात १२ हजार ६०६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. दृष्टिक्षेपात सौम्य लक्षणे - ११ हजार ६९६ रुग्ण विविध संस्थांमध्ये उपचार - ९०० कोविड केअर सेंटर - १७४ रुग्ण डिस्ट्रिक्ट कोविड हेल्थ सेंटर - १२१ डेडिकेट कोविड सेंटर - ४७५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com