Vaccination Center
Vaccination Centersakal media

मुंबई : लसीकरण केंद्रांची संख्या कमी होणार; ९६ टक्के नागरिक लसवंत

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जवळपास ९६ टक्के नागरिकांचे कोरोनाच्या लशीच्या (corona vaccination) दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. अनेक लसीकरण केंद्रांवर (vaccination center) दिवसभरात मोजकेच नागरिक येत असल्याने महापालिकेने लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पालिकेच्या (bmc) अखत्यारीतील सार्वजनिक लसीकरण केंद्रे बंद केली जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी दिली.

Vaccination Center
ठाणे जिल्ह्यातील ५४ गावे लसवंत; १०० टक्के नागरिकांची पहिली मात्रा पूर्ण

मुंबईत एकूण ४४० कोविड लसीकरण केंद्रे असून त्यापैकी २७२ केंद्रे महापालिकेची आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी नगरसेवकांच्या अखत्यारीतील २२७ वॉर्डांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू केली होती; मात्र आता बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने दिवसभरात या केंद्रांवर फारसे नागरिक येत नाहीत. दुसरीकडे ही केंद्रे सुरू ठेवण्यासाठी बऱ्यापैकी मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे ज्या केंद्रावर लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे, ती केंद्रे बंद करण्याचा पालिकेचा विचार आहे.

लसीकरणाचे घटते प्रमाण

मुंबईतील ९६ टक्क्यांहून अधिक नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे लशींची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. शुक्रवारी मुंबईत केवळ २२,११० नागरिकांचे लसीकरण झाले. तत्पूर्वी गुरुवारी आणि बुधवारी अनुक्रमे २७,०५५ आणि २२,५८९ नागरिकांनी लस घेतली.

Vaccination Center
मुंबादेवी: लग्नासाठी नाव नोंदणी; तरुणीला ४५ लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना अटक

काही आठवड्यांत मुंबई लसवंत

मुंबईत लसीकरणास पात्र असलेल्या नागरिकांची संख्या ९२ लाख असून त्यापैकी जवळपास ८८ लाख नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. उर्वरित चार लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी काही आठवड्यांचा अवधी लागू शकतो. त्यांचे लसीकरण पूर्ण होताच संपूर्ण मुंबई लसवंत होईल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लसीकरणाची सद्यस्थिती लक्षात घेता काही केंद्रे निश्चितच बंद करता येतील; मात्र दुसरा डोस न झालेल्या मोजक्या नागरिकांसाठी मोबाईल व्हॅन आणि शिबिरांद्वारे लसीकरण सुरूच राहील.

- सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com