मुंबई : अंथरुणाला खिळलेले ९८ टक्के रुग्ण लसवंत | Mumbai corona vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination
अंथरुणाला खिळलेले ९८ टक्के रुग्ण लसवंत

मुंबई : अंथरुणाला खिळलेले ९८ टक्के रुग्ण लसवंत

मुंबई : मुंबईतील पात्र लाभार्थ्यांचे लवकरात लवकर लसीकरण (corona vaccination) व्हावे, यासाठी पालिका (bmc) विविध उपाययोजना करत आहे. त्यात पालिकेला यशही आले आहे. त्यामुळेच अंथरुणाला खिळलेल्या ९८ टक्के रुग्णांना (Bedridden patients) लशीचे दोन्ही डोस देण्यात आले. तसेच अवघ्या ४७ दिवसांत पालिकेने ५६ टक्के किशोरवयींना लशींचा (teenager vaccination) पहिला डोस दिला आहे.

हेही वाचा: पैसे घेऊन राज ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना सोडणार नाही - राजू पाटील

ऑगस्ट महिन्यात अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना त्यांच्या घरीच जाऊन लसीकरण मोहीम पालिकेने सुरू केली. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या जवळपास सहा हजारांहून अधिक रुग्णांनी लसीकरणासाठी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. त्यापैकी आतापर्यंत ५८०० हून अधिक म्हणजे ९८ टक्के रुग्णांचा पहिला डोस पूर्ण झाला. त्यासाठी खासगी संस्थांनीही महापालिकेला सहकार्य केले आहे. या मोहिमेबद्दल उच्च न्यायालयानेही मुंबई पालिकेचे कौतुक केले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईशिवाय इतर जिल्ह्यांतही घरोघरी लसीकरणाची मोहीम यशस्वी झाली आहे. नाशिक, पुणे तसेच अहमदनगरमध्ये अनुक्रमे १,३००, १००० आणि ८०० रुग्णांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे.
- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी.

५६ टक्के किशोरांचे लसीकरण

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सहा लाखांहून अधिक किशोरवयीन असून आतापर्यंत तीन लाख ४६ हजार २४ म्हणजेच ५६ टक्के किशोरांना पहिला, तर एक लाख आठ हजार २२ म्हणजेच १७ टक्के किशोरांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top