high blood pressure
high blood pressure sakal media

उच्च रक्तदाबाचे रुग्ण सहा लाखांहून अधिक; मुंबईत ३० हजार रुग्ण उपचाराधीन

मुंबई : कोरोना महामारीतही (corona Pandemic) राज्यातील ‘एनसीडी’ (non communicable diseases) म्हणजेच असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने जागतिक आरोग्य दिनानिमित्त (International Health Day) ‘फिट महाराष्ट्र’ मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. ‘एनसीडी’तून होणाऱ्या तीव्र आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ट मोहिमेअंतर्गत राबवण्यात येणार आहे. ‘एनसीडी’त प्रामुख्याने उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तोंडाच्या कर्करोगाच्या आजारांची (cancer disease) नोंद केली जाते. त्यानुसार राज्यात सध्या ६ लाख ६ हजार १५९ उच्च रक्तदाब (high blood pressure) असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ३० टक्के नागरिक मधुमेहाने आजारी असल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

 high blood pressure
ठाणे जिल्ह्यातही मराठीतच पाट्या; आस्थापनांना 'ही' नावे देता येणार नाहीत

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ एप्रिल २०२२ पर्यंत २ लाख ७२ हजार २१९ नागरिकांना मधुमेहाचे निदान झाले आहे. त्यांपैकी २ लाख ६२ हजार ३८१ नागरिकांवर उपचार सुरू आहेत. जवळपास ३० टक्के नागरिकांना मधुमेहाचा आजार आहे. आतापर्यंत राज्यात मधुमेहाने आजारी असलेल्या ९९ लाख १४ हजार ८२ नागरिकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ६ लाख ६ हजार १५९ उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत ९९ लाख ५८ हजार ६७८ नागरिकांचे स्क्रिनिंग झाले असून त्यातील ६ लाख १३ हजार ७८२ जणांमध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झाले आहे. तोंडाच्या कर्करोगासाठी ९८ लाख ५८ हजार नागरिकांचे स्क्रिनिंग केले गेले. त्यांपैकी १,५८३ नागरिकांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे निदान झाले असून ८३५ जणांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून ३४ जिल्ह्यांमध्ये असंसर्गजन्य आजारांसाठी कार्यक्रम राबवला जात आहे.

 high blood pressure
रायगड : महसूल सहाय्यकांच्या संपामुळे कामे खोळंबली; कार्यालयांमध्ये शुकशुकाट

त्यात २०१८ पासून लोकसंख्या आधारित स्क्रिनिंग किंवा युनिव्हर्सल स्क्रिनिंग राबवले जात आहे. त्या अंतर्गत २०१८ पासून ६ एप्रिलपर्यंत वरील तिन्ही आजारांसाठी १ कोटी ३ हजार ४७५ नागरिकांचे स्क्रिनिंग केले गेले. त्यातील ७ लाख ६० हजार ५०१ नागरिकांचे वेगवेगळ्या आजारांसाठी निदान झाले असून त्यापैकी ७ लाख ३४ हजार ३३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

असंसर्गजन्य आजारांचे रुग्ण शोधण्याचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे. स्क्रिनिंगचे प्रमाण वाढल्याने रुग्णही वाढले आहेत. आमच्या १०० टक्के उद्दिष्ट असलेल्या लोकसंख्येपैकी ५० टक्के नागरिकांचे स्क्रिनिंग असंसर्गजन्य कार्यक्रमात झाले. ३० वर्षांवरील नागरिकांकडून सीबॅक नावाचा एक अर्ज भरून घेतला जातो. त्याअंतर्गत लोकसंख्येनुसार स्क्रिनिंग केले जाते.
- डॉ. पद्मजा जोगेवार, सहसंचालक, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम.

मुंबईत ३० हजार रुग्ण उपचाराधीन

असंसर्गजन्य आजाराअंतर्गत मुंबईत जवळपास ३० ते ३२ हजार रुग्णांची नोंद आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी काही रुग्ण उच्च रक्तदाबाचे आहेत. काही मधुमेहाने ग्रस्त आहेत. काही रुग्णांना दोन्ही आजार आहेत. हे सर्व रुग्ण पालिकेच्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्यांना खर्च परवडत नाही त्यांना दवाखान्यात मोफत उपचार दिले जातात. त्यातून पहिल्या टप्प्यावर रुग्णांना बरे करण्यात यश येते, अशी माहिती पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com