Dog Bite: एक दोन नाही तर तब्बल इतक्या हजार नागरिकांना घेतला श्वानांनी चावा

Dog Bite: एक दोन नाही तर तब्बल इतक्या हजार नागरिकांना घेतला श्वानांनी चावा


Alibag News: श्‍वानदंशाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. वर्षभरात तब्बल १६ हजार ९६४ श्‍वानदंशाच्या घटना घडल्या आहेत.

दरवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सरासरी ४० टक्क्याने वाढले आहे. याप्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Dog Bite: एक दोन नाही तर तब्बल इतक्या हजार नागरिकांना घेतला श्वानांनी चावा
Alibag News: अलिबागमध्ये निवारा केंद्रासाठी १६० कोटींचा प्रस्ताव!

रायगड जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागांत श्‍वानदंशांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण भागात १३ महिन्यांत ६२६ श्वानदंशाच्या घटना घडल्याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालय विभागाकडे आहे.

यातील गंभीर रुग्‍णांना मुंबईतील रुग्‍णालयात हलवण्यात आले आहे. वेळीच उपचार मिळत असले तरी नागरिकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत आहे.

Dog Bite: एक दोन नाही तर तब्बल इतक्या हजार नागरिकांना घेतला श्वानांनी चावा
Alibag Banana News : केळीच्या खोडापासून बनवली ‘दोरी’

निर्बीजीकरण मोहीम थंडावल्‍याने भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. जिल्‍हाभरात दिवसाला सरासरी ८५ जणांना कुत्र्यांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागत असल्याची स्‍थिती आहे.

कुत्र्यांच्या दहशतीमुळे शहरी भागात रात्रीचा फेरफटका मारणेही कठीण झाले आहे. रात्रपाळी संपून येणाऱ्या कामगारांना याचा जास्तच त्रास होतो. अनेकदा कुत्र्यांची झुंड दुचाकीस्‍वाराच्या मागे लागत असल्‍याने नियंत्रण सुटून अपघात झाल्‍याच्या घटनाही घडल्‍या आहेत.

सूचनाफलक गरजेचा


नव्याने येणाऱ्या व्यक्तीला येथे राखणेसाठी कुत्रा असल्याचे माहिती होण्यासाठी ‘सावधन, येथे कुत्रा आहे’ अशा आशयाचे फलक लावणे गरजेचे आहे. किंवा कुत्र्याला बंदिस्त जागेत व्यवस्थित बांधून ठेवणे आवश्यक आहे. यामुळे कुत्र्यांकडून अचानक होणारे हल्ले कमी होतील.

Dog Bite: एक दोन नाही तर तब्बल इतक्या हजार नागरिकांना घेतला श्वानांनी चावा
Alibag News : दरडप्रवण गावांवर प्रशासनाचा राहणार वॉच; अधिकाऱ्यांकडे दिले पालकत्‍व

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणे आवश्‍यक असून ही जबाबदारी नगरपालिकांनी आहे. श्‍वानदंशाच्या घटना वाढल्‍याने प्राथमिक आरोग्य केंद्रात लशींचा जादा साठा ठेवावा लागतो.


- डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

श्‍वानदंशानंतर वेळ न घालवता त्वरित जवळील सरकारी दवाखान्यात दाखल करून उपचार घ्यावेत. तसेच रेबीज लसीकरण करून घ्‍यावे.


- डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्‍यचिकित्सक

Dog Bite: एक दोन नाही तर तब्बल इतक्या हजार नागरिकांना घेतला श्वानांनी चावा
Mumbai News : मॅकडोनाल्डविरोधात कारवाई करा....; मुंबई पोलिसांना पत्र लिहून मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com