Luxury House
Luxury Houseesakal

Luxury House : आलिशान घरांच्या मागणीत कोरोनानंतर वाढ

कोविडपूर्वी मोठ्या घरांच्या मागणीत घट झाली होती; मात्र कोविड काळात सर्वांनाच सुखसोयींसह सर्व सुविधांनी युक्त असे मोठे घर नागरिकांना हवेसे वाटू लागले.
Summary

कोविडपूर्वी मोठ्या घरांच्या मागणीत घट झाली होती; मात्र कोविड काळात सर्वांनाच सुखसोयींसह सर्व सुविधांनी युक्त असे मोठे घर नागरिकांना हवेसे वाटू लागले.

मुंबई - कोरोनापूर्वी मोठ्या आलिशान घरांना प्रतिसाद कमी होता; मात्र कोरोनानंतर सर्व सोयींनी युक्त अशा स्वतःच्या मोठ्या घरांची गरज वाढल्यामुळे आलिशान घरांची मागणीही वाढल्याचे नरेडकोच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नहार ग्रुपच्या उपाध्यक्ष मंजू याज्ञिक यांनी सकाळला सांगितले.

गेले अनेक महिने सर्वच घरांची मागणी वाढते आहे; मात्र फेब्रुवारीपासून आलिशान घरांच्या मागणीतही मोठी वाढ होत आहे. सर्व प्रकारच्या एकूण घरविक्रीची संख्या घटली असली, तरी सरकारचा मुद्रांक शुल्काचा महसूल वाढला आहे. यामुळे आलिशान घरांची मागणी वाढल्याचे (एकूण घरविक्रीपैकी १५ टक्के) दिसून येते, असेही त्यांनी दाखवून दिले.

कोविडपूर्वी मोठ्या घरांच्या मागणीत घट झाली होती; मात्र कोविड काळात सर्वांनाच सुखसोयींसह सर्व सुविधांनी युक्त असे मोठे घर नागरिकांना हवेसे वाटू लागले. लक्झरी क्षेत्रातील घरांची मागणी वाढल्यानंतर अनिवासी भारतीयांनीही या क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणली. त्यामुळे विकसकांनीही या क्षेत्राच्या घरनिर्मितीवर भर दिला. मोठ्या घरांच्या मागणीतील वाढ ही कृत्रिम सूज नाही, वास्तववादी आहे. खरेदीदारांकडे खरोखर पैसे आहेत म्हणून दुसरे आलिशान घर घेत आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपले अर्ध्यात सोडलेले आलिशान घरांचे प्रकल्पही आता सुरू केले आहेत. चांगल्या राहणीमानाचे (लाईफस्टाईल) मूल्यही सर्वांना कळले असून त्यामुळे लोकांनी लक्झरी घरात गुंतवणूक सुरू केल्याचेही याज्ञिक यांनी दाखवून दिले.

Luxury House
Aashish Shelar : कॅगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एस्आयटी मार्फत चौकशी करा

देशात सर्वच घरांच्या मागणीत आलेली वाढ आता येत्या अनेक वर्षांत कायम राहील. आज या क्षेत्रात गुंतवणूकदार कमी असून खरेदीदार जास्त आहेत. आज कर्जांचे व्याजदर महागले आहेत, मुद्रांक शुल्क वाढले आहे. त्यामुळे खरे खरेदीदारच घरे घेत असल्याचे दिसून येते, असेही त्या म्हणाल्या.

प्रदूषणविरोधी नियम पाळावेत

महामुंबईत वाढती बांधकामे हे वायुप्रदूषणाचे कारण ठरत असल्याचा आरोप होत आहे. यासंदर्भात व्यावसायिकांनी नियम पाळायला हवेत; मात्र घरे ही गरज असल्याने कोरोनानंतर त्यांचे बांधकाम पूर्ण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे यासंदर्भात सर्वसमावेशक भूमिका स्वीकारली पाहिजे, असेही नरेडकोच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि नहार ग्रुपच्या उपाध्यक्ष मंजू याज्ञिक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com