Rahul Gandhi: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनाने भारावले शिवसैनिक!

Rahul Gandhi: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनाने भारावले शिवसैनिक!

राहुल गांधींनी शिवसैनिकांची मने जिंकली|Rahul Gandhi won the hearts of Shiv Sainiks

Rahul Gandhi Bharat Jodo Mumbai: एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्क मैदानात सभा घेऊन ‘इंडिया’ आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

या सभेपूर्वी राहुल गांधी यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. राहुल यांच्या या कृतीमुळे शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची मने जिंकली असून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला होईल, अशी शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत.(bharat jodo in mumbai)

Rahul Gandhi: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनाने भारावले शिवसैनिक!
Bharat Jodo: मोदींकडून २४ तास जनतेची लूट, खंडणी सत्र सुरू; राहूल गांधींचा गंभीर आरोप

शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे एक वेगळेच ऐतिहासिक नाते आहे. ४० वर्षांत गांधी घराण्यातील कोणत्याही नेत्याची येथे सभा झाली नव्‍हती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या सभेला विशेष महत्त्व असून इंडिया आघाडीतील देशभरातील नेते या सभेला उपस्थित होते. त्यामुळे राहुल गांधी यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष होते.(rahul gandhi at balasaheb samadhi)

राहुल गांधी यांनी मणिभवन येथे महात्मा गांधी आणि चैत्यभूमीला भेट दिल्यानंतर त्यांनी शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन वंदन केले.

राहुल गांधी यांच्या कृतीमुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांत उत्साह निर्माण केला आहे. राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत साथ देण्याचा निर्धारही बोलून दाखवत आहेत.(balasaheb thackeray samadhi rahul gandhi)

Rahul Gandhi: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनाने भारावले शिवसैनिक!
Bharat Jodo Nyay Yatra: राजकीय चिखलफेकीसाठी विठू माऊलीचा वापर! राहुल गांधींच्या सभेतील 'त्या' व्हिडिओचे चुकीचे दाखले

देशातील हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाही आणि घटना वाचवणे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे. यासाठी राहुल गांधी हे देशपातळीवर निडरपणे लढत आहेत. त्याचे आम्हाला कौतुक आहेच; पण त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन करणे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.


- अजय चौधरी, आमदार, शिवडी


राहुल गांधी यांनी बाळासाहेबांना दिलेल्या मानवंदनेमुळे खूप चांगले वाटले. शिवसैनिक भारावून गेले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण निश्चितच सकारात्मक परिणाम करीत आहे. महाविकास आघाडीला केवळ शिवसैनिकांचाच नाही तर सर्वसामान्य लोकांचा प्रतिसादही वाढेल. लोकशाहीची हत्या होऊ नये, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यासाठी राहुल गांधी यांचे कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. यामुळे सर्व शिवसैनिक आघाडीच्या मागे एकदिलाने उभे राहतील.


- अनिल कोकीळ, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख

Rahul Gandhi: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनाने भारावले शिवसैनिक!
Bharat Jodo: राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी

ज्या मोदींना बाळासाहेबांनी राजकीय जीवदान दिले, त्यांनी कधीही शिवतीर्थावर येऊन साहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केलेले नाही. उलट बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी फोडली. तर काँग्रेसच्या इंदिरा गांधींच्या काळातही आणीबाणीत शिवसेनेवर बंदीचा प्रस्ताव फेटाळला . आज शिवसेनेच्या कठीण काळात राहुल गांधी यांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले. सोबतच शिवसेनेची साथ देण्याचे वचन दिले. महाराष्ट्र हे कधीही विसरणार नाही. यासाठी ‘...म्हणून माझे मत महाविकास आघाडीला...’ असे कॅम्पेनही सुरू केले जाणार आहे.


- सचिन पडवळ, माजी नगरसेवक, मुंबई महापालिका

Rahul Gandhi: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाच्या दर्शनाने भारावले शिवसैनिक!
Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रेचे मालेगाव शहरात उत्स्फुर्त स्वागत! राहुल गांधींच्या रोड शोला जोरदार प्रतिसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com