Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatraesakal

Bharat Jodo: राहुल गांधींच्या सभेसाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी

Bharat Jodo: भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी मुंबईत पोहोचत असून रविवारी (ता.१७) सायंकाळी शिवाजी पार्क मैदानात सभा होणार आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo: राहुल गांधींच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज; होणार जोरदार शक्तीप्रदर्शन

त्यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीकडून मोठी तयार सुरू असून दादरच्या शिवजी पार्क मैदानात तब्बल ४०० लोक बसतील एवढा भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. तसेच सभेल उपस्थित राहणाऱ्यांसाठी तब्बल एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली.

या सभेला राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच देशभरातून ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी सभेची जय्यत तयारी सुरू असून भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo : तपास यंत्रणांचा वापर करून खंडणी उकळण्याचे रॅकेट; गांधींचा गंभीर आरोप

तसेच मुख्य स्टेजच्या दोन्ही बाजुला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र स्टेज उभारण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण मैदानात १९ ब्लॉक केले असून गर्दी होणार नाही याची खबरदारी घेतली आहे. शिवाजी पार्कवर सभेची तयारी सुरू असून वर्षा गायकवाड, सचिन सावंत संपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.

तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री हुसेन दलवाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अनिल देसाई यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभास्थळी भेट देत तयारीची पहाणी केली.

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra
Nashik Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींसाठी नाशिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com