Mumbai University: मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांना मराठीचे वावडे

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांना मराठीचे वावडे

Mumbai News: मुंबई विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक, व्यवस्थापन आणि राज्यपाल नियुक्त सिनेट (अधिसभा) सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांना मराठीचे वावडे असल्याची बाब नुकत्याच झालेल्या सिनेट सभेच्या कार्यक्रमातून समोर आली आहे. दुसरीकडे विद्यापीठाने मराठीच्या वापरासाठी आपली आग्रही भूमिका दाखवून देत बहुतांश कामकाज मराठीतून करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही दिसून आले आहे.

राज्यात मराठीचा सर्वच क्षेत्रांत अधिकाधिक वापर व्हावा यासाठी सरकारने १३ मार्चला मराठी भाषा धोरण जाहीर केले. या धोरणाची अंमलबजावणीही सुरू झाली असून याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाची यंदाची वार्षिक सिनेट सभा २३ मार्चला पार पडली.या सभेत प्रश्‍नोत्तरासाठी दिलेल्या यादीत ज्या २५ सदस्यांनी विविध विषयांवरील प्रश्‍न उपस्थित केले होते, त्यापैकी केवळ चार सदस्यांचा अपवाद वगळता बहुतांश सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित करण्यासाठी मराठीचा वापर न करता सर्वच प्रश्‍न इंग्रजीतून विचारले.

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांना मराठीचे वावडे
Mumbai Crime News: धक्कादायक! घरासाठी लागणार होते तब्बल 23 लाख; पैशासाठी 9 वर्षाच्या मुलाचं अपहरण करुन केली हत्या!

दुसरीकडे विद्यापीठाने मात्र मराठीचा आग्रह धरत यातील काही सदस्यांच्या इंग्रजीतील प्रश्‍नांची उत्तरे मराठीतून देण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेट सभेतील अर्थसंकल्पीय कामकाज, स्थगन प्रस्ताव आणि प्रश्‍नोत्तरे याचेही कामकाज करण्यासाठी मराठीला प्राधान्य दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावावरील संपूर्ण उत्तर सभेचे अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी मराठीतून देत सभागृहातील सदस्यांचे समाधान केले.

प्रश्‍नोत्तराच्या तासात प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनीही सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना मराठीतून उत्तरे दिली. इतर कामकाजासंदर्भातील माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी मराठी आणि आवश्यकता पडेल तिथे इंग्रजीचा वापर करून सदस्यांचे समाधान केले. या एक दिवसाच्या सभेत मुंबई विद्यापीठाने कामकाज मराठीतून करून आपली मराठी भाषेसंदर्भातील आग्रही भूमिका यानिमित्ताने स्पष्ट केली.


विद्यापीठाच्या सिनेट सभेत विद्यार्थी, प्राध्यापक आणि एकूणच विद्यापीठ हितासंदर्भात विविध विषयांवरील प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते. त्यापैकी मराठी भाषेतून प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांची संख्या केवळ चार इतकीच आहे. त्यात डॉ. विश्‍वंभर जाधव, मयूरेश नेटकर, डॉ. वंदना महाजन, विनोद कुमरे यांचा समावेश आहे; तर डॉ. सोमनाथ कदम यांनी आपल्या तीन प्रश्‍नांपैकी एक प्रश्‍न मराठीतून उपस्थित केला होता.

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांना मराठीचे वावडे
Navi Mumbai Crime: पोलिसांनी रचला सापळा अन् अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना केली अटक

विद्यापीठाने सादर केलेल्या प्रश्‍नोत्तराची प्रत ही मराठीतूनच काढली आहे. यात प्रत्येक सदस्याची नावे विद्यापीठाने मराठीतून दिली. यातील इंग्रजीतून प्रश्‍न विचारलेल्या सदस्यांच्या प्रश्‍नांना मराठीतून उत्तर दिले आहे. त्यात रवींद्र घोडविंदे, प्रो. जितेंद्रनाथ झा, सोमनाथ कदम, जगन्नाथ खेमनर, डॉ. विजय पवार आदी सदस्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे विद्यापीठाने मराठीतून दिली आहेत.
--
मराठीसाठी विद्यापीठाचा पुढाकार
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सभेमध्ये विद्यापीठाकडून जास्तीत जास्त मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात प्रामुख्याने विद्यापीठाने सादर केलेला अर्थसंकल्प आणि त्यासाठी सादर करण्यात आलेले २०२४-२५ चे अर्थसंकल्पीय अंदाज तसेच वित्त व लेखा प्रभारी अधिकारी रवींद्र बांबर्डेकर यांचे अर्थसंकल्पावरील भाषण हे मराठीतून उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला.

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांना मराठीचे वावडे
Mumbai News: दोघांमधील वाद सोडवायला जाणे पडले महागात; हॉटेल आचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

याशिवाय अर्थसंकल्पावरील चर्चा आणि त्यासंदर्भातील बहुतांश उत्तरे ही विद्यापीठाकडून मराठीतून देण्यात आली. यामुळे विद्यापीठाची भूमिका मराठीच्या वापरासंदर्भात आग्रही असली तरी प्राध्यापक, प्राचार्य, व्यवस्थापन आणि राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांनी मात्र आपले प्रश्‍न इंग्रजीतून उपस्थित करून आपल्याला मराठीचे वावडे असल्याचे दर्शन घडवले असल्याने यावर मराठी भाषाप्रेमी आणि तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यपालनियुक्त सदस्यांचाही समावेश
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी इंग्रजीतून प्रश्‍न उपस्थित करणाऱ्यांत राज्यपालनियुक्त सदस्यांचाही समावेश आहे. यातील काही सदस्यांनी सभेच्या कामकाजात पूर्णपणे मौन बाळगले होते. काहींनी प्रश्‍न उपस्थित करूनही त्यावर परिणामकारक चर्चा होईल, असे कोणतेही मुद्दे उपस्थित केले नव्हते. त्यामुळे त्यांच्या मौनावरही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

Mumbai University: मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांना मराठीचे वावडे
Mumbai News: धुळवडीला गालबोट; पाच जण समुद्रात बुडाले; दोघांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com