Mumbai bkc park
Mumbai bkc parksakal

Mumbai : बीकेसीत सर्वसुविधांयुक्त मनोरंजन पार्क उभारले जाणार

मिठी नदीकाठच्या बीकेसीमधील जी ब्लॉकमध्ये एमएमआरडीए मनोरंजन पार्क उभारणार

मुंबई : मिठी नदीकाठच्या बीकेसीमधील जी ब्लॉकमध्ये एमएमआरडीए मनोरंजन पार्क उभारणार आहे. या पार्कमध्ये बगिचा, बँक्वेट, इनडोअर गेम, जलतरण तलाव, प्रेक्षागृह, रेस्टोरंट, हेलिपॅड अशा सोयीसुविधांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने यासंबंधी तयारी सुरू केली आहे. कंत्राटदार आणि भागीदारी यातून हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

निविदेनुसार, एकूण तब्बल एक लाख आठ हजार ५४६.५१ चौ.मी. क्षेत्रफळाच्या तीन भूखंडापैकी दोन भूखंड सीआरझेडमध्ये अंतर्भूत आहेत. यापैकी पहिला भूखंड २२ हजार ७९४ चौ. मी. क्षेत्रफळाचा असून त्यापैकी ३ हजार १९.१० चौ.मी म्हणजे १५ टक्के क्षेत्र खुले असेल. या जागेवर बगिचा, खेळाची मैदाने या सुविधा उभारल्या जातील.

Mumbai bkc park
Mumbai: सामाजिक संवेदनाला आत्मियतेची जोड

६० हजार ९७७ चौ.मी. क्षेत्रफळापैकी १७ हजार ३९८ चौ.मी. क्षेत्र सीआरझेडमध्ये असून त्यातील २६०९.७५ चौ.मी. क्षेत्र मोकळी जागा असेल. या जागेत बँक्वेट हॉल उभारण्यात येईल; तर ४३ हजार ५७९ चौ. मीटर क्षेत्र विनासीआरझेड श्रेणीतील असल्याने त्यापैकी १२ हजार ५६५ चौ. मीटर क्षेत्रात बांधकाम करता येणार आहे.

या ठिकाणी क्लब हाऊस, इनडोअर गेम, वाहनतळ, हेलिपॅड, स्वीमिंग पूल यांसारख्या सुविधा देण्यात येणार आहे. तिसरा भूखंड टेकडीचा भाग असून २४ हजार ७७४ चौ. मीटर क्षेत्रात वनस्पती उद्यान उभारण्याचा एमआरडीएचा मानस आहे. वनस्पती उद्यान सार्वजनिक उपयोगासाठी असल्याने या ठिकाणी येणाऱ्यांना शुल्क आकारले जाणार नाही.

Mumbai bkc park
Mumbai News : मध्य रेल्वेची लोकल सेवा दररोजच १५ ते २० मिनिटे विलंबाने!

या सुविधा सशुल्क
उद्यान आणि बगिचात येणाऱ्यांना शुल्क आकारणी, खेळाच्या स्पर्धांचे आयोजन, बँक्वेट हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमांना आकारले जाणारे शुल्क, क्लब हाऊस मेंबरशिप आणि हेलिपॅड सर्व्हिस यामुळे या प्रकल्पातून महसूल निर्माण होईल. या महसुलात कंत्राटदारासोबत एमएमआरडीएच्या भागीदारी असेल. या सर्व बांधकामासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. ६० वर्षांच्या करारावर हे पार्क चालवले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com