SACHIN PILGAVKAR
SACHIN PILGAVKARSAKAL

सचिन पिळगावकरांनी जागवली उर्दूवरील प्रेमाची आठवण

मुंबई, ता. १९ : बाल कलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे प्रख्यात अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मराठीबरोबरच उर्दू भाषेवर आपले किती प्रेम आहे, हे स्वत:च उलगडून सांगितले.

ते ‘पसाबण- ए-अदब’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या मिरास-फेस्टिव्हल ऑफ हिंदुस्थानी कल्चर अँड लिटरेचर या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी सचिन पिळगावकर यांना उर्दू भाषेवर प्रेम कसे जडले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, उर्दू भाषा माझ्या आयुष्याचाच नाही, तर माझ्या शरीराचाच एक भाग आहे.

SACHIN PILGAVKAR
Sachin Pilgaonkar: बापाला जे जमलं नाही ते लेकीनं केलं.. सचिन पिळगावकरांनी सांगितला श्रियाचा 'तो' किस्सा..

नरिमन पॉईंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भारतीय साहित्य, कविता, संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांच्या उपस्थितीत १६ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस हा महोत्सव रंगला. उर्दू भाषेशी नाळ कशी जुळली हे सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले की, मी मराठी वातावरणातच लहानाचा मोठा झालो. त्या वेळी मराठी सोडून कोणतीच भाषा मला माहिती नव्हती. मराठी चित्रपटानंतर हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून माझा प्रवास सुरू झाला. त्या वेळी दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांचा मजली दीदी चित्रपट करत होतो.

यात ग्रेट ट्रॅजिडी क्वीन मीनाकुमारी मजली दीदी साकारत होत्या. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना मीनाजींनी तू घरी कोणती भाषा बोलतोस, असा प्रश्न केला. त्यावर मी मराठी असे उत्तर दिले. मग त्यांनी हिंदी कधी बोलतोस? असे विचारल्यावर सेटवर येतो त्यावेळी बोलतो, असे सांगितले.

SACHIN PILGAVKAR
सुप्रिया पिळगावकरांनी १९९५ मध्येच दाखवलं होतं मास्क कसा घालावा, मुलगी श्रियाने केला गमतीशीर व्हिडिओ शेअर

त्यावर त्यांनी माझ्या आई-वडिलांना सेटवर बोलावून घेतले. आई-वडील सेटवर आल्यावर मीनाजी म्हणाल्या, तुमचा मुलगा एक उत्तम अभिनेता आहे. तो हिंदी बोलताना त्यात मराठीची झलक असते. त्यामुळे उर्दू बोलता येणे खुप गरजेचे आहे. यावर आई-वडिलांनी काय करावे, अशी विचारणा केल्यावर त्यांनी रोज शाळा सुटल्यानंतर आठवड्यातून चार दिवस उर्दू शिकवण्याची तयारी दाखवली. अशा प्रकारे मी उर्दू शिकलो, अशी आठवण सचिन पिळगावकर यांनी सांगितली.
….
विविध कार्यक्रमांची रंगत
दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सत्रांमध्ये कथ्थक ऑन गझल - नीरजा आपटे आणि चमू; सूफी संगीत वादक पद्मश्री उस्ताद अहमद हुसेन, पद्मश्री उस्ताद मोहम्मद हुसेन यांनी सादर केले. तसेच मिकी सिंग नरुला, इर्शाद कामिल, जावेद अख्तर, ज्योती त्रिपाठी, खान शमीम, मुझफ्फर अब्दाली, नोमान शौक, ओबेद आझमी, क्वेसर खालिद, रणजीत चौहान, सचिन पिळगावकर, उस्ताद शुजात हुसेन खान (ग्रॅमी पुरस्कार निर्देशन) यांच्यासह विविध कलाकार ‘सितार विथ सारेगम’मध्ये सहभागी झाले होते.

SACHIN PILGAVKAR
सचिन पिळगावकरांनी जागवली उर्दूवरील प्रेमाची आठवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com