mumbai airport
mumbai airport esakal

Mumbai Airport: मुंबई विमानतळावरील प्रवासी संख्येत ३५ टक्के वाढ!

Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून गेल्या वर्षी ५१.५८ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्‍च वाहतुकीची नोंद असून २०२२ च्‍या तुलनेत ३५ टक्‍क्‍यांनी प्रवासीसंख्येत वाढ झाली आहे.

mumbai airport
Mumbai News : त्यांची अवस्था रावणासारखी होईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी २०२३ हे वर्ष लाभदायी ठरले आहे. कोरोनापूर्व आणि कोरोनानंतर प्रवासी वाहतूक पाहता गेल्या वर्षी प्रवासीसंख्या वाढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर वर्ष २०२२ च्‍या तुलनेत प्रवासी वाहतुकीमध्‍ये उल्‍लेखनीय ३५ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. विमानतळावरून ५१.५८ दशलक्ष प्रवाशांचा प्रवास झाला असून यामध्ये २५.४ दशलक्षहून अधिक आगमन आणि २६.१ दशलक्षहून अधिक निर्गमनाची नोंद करण्‍यात आली आहे.

mumbai airport
IndiGo Mumbai airport: रनवेवर बसून प्रवाशांनी केलं जेवण; इंडिगो आणि मुंबई विमानतळाला मंत्रालयाची नोटीस, दिला गंभीर इशारा

. देशांतर्गत प्रवासात दिल्‍ली, बेंगळूर आणि चेन्‍नई ही ठिकाणे; तर आंतरराष्‍ट्रीय प्रवासात दुबई, लंडन आणि अबुधाबी सर्वाधिक पसंतीची ठिकाणे ठरली आहेत.

२५ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक प्रवास
नोव्‍हेंबर व डिसेंबर या कालावधीत सर्वाधिक विमान प्रवास करण्यात आला. यामध्ये २५ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवसात १ लाख ६७ हजार १३४ प्रवाशांनी विमानप्रवास केला आहे. यामध्ये १ लाख २० हजारहून अधिक देशांतर्गत प्रवासी आणि ४६ हजारहून अधिक अधिक आंतरराष्‍ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे.

mumbai airport
Mumbai Airport: मुंबई विमानतळ सुसाट; एका महिन्यात ४० लाख ४६ हजार प्रवाशांनी केला प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com