praniti shinde
praniti shindesakal

Congress News: महिलांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे; आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिपादन

Congress News: महिलांना आदर सन्मान मिळायला पाहिजे तो मिळत नाही. घरी असो वा बाहेर त्यांचा आवाज दाबण्याचे काम केले जात असल्याचे मत कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी वाडा येथे व्यक्त केले.

praniti shinde
Solapur News : भाजपने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोणतीही ऑफर दिली नाही ; चंद्रशेखर बावनकुळे

वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन मंगळवारी के. डी. रंगमंच सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, कॉंग्रेस पक्षाने महिलांचा वेळोवेळी सन्मान केला आहे. विविध योजना महिलांसाठी आणल्या आहेत.

praniti shinde
Sushilkumar Shinde: प्रणिती शिंदे अन्‌ मला भाजपची ऑफर! माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेचा गौप्यस्फोट; चंद्रकांत पाटील आज घेणार भेट

मात्र आताचे सरकार महिलांच्या विरोधात विचार करणारे आहे. भाजप महिलांकडे वस्तु म्हणून बघतात. तीला तुच्छ ठरवितात. आता यांच्या विरोधात जोरदारपणे महिलांनी रणांगणात उतरले पाहिजे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

या कार्यक्रमास कॉंग्रेस किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, ज्येष्ठ नेते मनीष गणोरे, नीलेश भोईर, वाडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील आदी मान्यवरांसह शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिला मेळाव्यानंतर पुरुष व महिलांचे कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते.

praniti shinde
Solapur News : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय लावून धरू; आमदार प्रणिती शिंदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com