Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Express Waysakal

Expressway News: आज मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे राहणार तब्बल इतके तास बंद

कर्जत-पनवेल दुहेरी मार्गाकरिता पुणे मार्गिका शटडाऊन | Pune route shutdown for Karjat-Panvel double route


Navi Mumbai: कर्जत-पनवेल दुहेरी मार्गावर चिखले रेल्वे स्थानकाजवळ उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पातील पुलाचे काम आज करण्यात येणार आहे.

या कामासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी मार्गिकेवरील वाहतूक अवजड व हलक्या वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे.(mumbai pune express way mega block)

Mumbai Pune Express Way
Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सेवा रस्ते करा, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तीन तास ही मार्गिका पूर्णपणे बंद राहणार असल्याचे महामार्ग पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रक काढून जाहीर केले आहे.


पनवेल ते कर्जत मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पात चिखले रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेमुळे हा रेल्वे मार्ग विभागला जातो. या ठिकाणी स्थानकाजवळ लोखंडी पूल टाकण्याचे काम रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे.(express way important News)

Mumbai Pune Express Way
Pune Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग होणार आठपदरी

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि.तर्फे हे काम करण्यात येत आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेकडच्या दिशेला पुलाचे काम केले जाणार आहे. त्याकरिता या मार्गिकेवर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत पूर्णपणे वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.(mumbai pune railway News)

या वेळेत पुण्याला जाण्याकरिता वाहतूक पोलिसांनी कळंबोली जंक्शन येथून एअरपोर्टच्या बाजूने बायपास मार्गाचा अवलंब करीत पळस्पेफाटा मार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा वापर करण्याचा पर्याय दिला आहे. तसेच या मार्गाहून आजिवली येथील बाह्यवळण घेऊन पुण्याच्या दिशेने जाता येणार आहे.(old Mumbai-Pune highway)

Mumbai Pune Express Way
Mumbai Pune Expressway Traffic Jam: सलग सुट्ट्यामुळे मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा; आजही वाहतूक धीम्या गतीनं सुरू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com