bmc tax news
bmc tax newssakal

BMC News: मालमत्ता कर वेळेत भरा, अन्यथा जप्तीची कारवाई; मनपा आक्रमक

मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या मालमत्तेवर अटकावणी आणि जप्तीची कारवाई केली जाईल |

Mumbai News: मालमत्ता कर दिलेल्या मुदतीत भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीधारकांना मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

दिलेल्या मुदतीत करभरणा न केल्यास मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार त्यांच्या मालमत्तेवर अटकावणी आणि जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा नोटिशींद्वारे देण्यात आला आहे.

bmc tax news
Mumbai Local News: मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन खात्याच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरांतील मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. नागरिकांची ऐनवेळची गैरसोय टाळण्यासाठी साप्ताहिक सुट्टी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सर्व विभागांत करभरणा करण्याची सोय करण्यात आली आहे.

काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप करभरणा करण्यात येत नसल्याने आणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे खात्याच्या वतीने नोटीस बजावल्या आहेत. या मालमत्ताधारकांनी दिलेल्या कालावधीत करभरणा न केल्यास त्यांच्या मालमात्तेला अटकावणी किंवा जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिशीत देण्यात आला आहे. त्यामुळे नोटीस मिळालेल्या मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तत्काळ करभरणा करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

bmc tax news
Mumbai Local Crime: धावत्या लोकलमध्ये दहा वर्षीय मुलीची छेड

मोठे थकबाकीदार (रक्कम रुपयांत)
१) एल अँड टी स्कॉमी इंजिनिअरिंग (एफ उत्तर विभाग) - ८८,६३,७८,६७९
२) रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग) - ७१,२३,६५,८५२
३) एचडीआयएल (एच पूर्व) - ५३,१२,३९,९५३
४ पोपटलाल जमनालाल, सी ब्रिझ बिल्डिंग ६ ते १५ मजले (जी दक्षिण) - ४७,९९,८४,७६६
५) एचडीआयएल (के पूर्व)- ४४,०५,५४,०३५
६) रघुवंशी मिल्स (जी दक्षिण विभाग)- १७,८७,६१,५६५
७) सुभदा गृहनिर्माण संस्था (जी दक्षिण) - १६,८४,७५,७००
८) नॉव्हेल्टी सिनेमा (डी विभाग) - १६,०१,८०,०६३
९) ओमकार डेव्हलपर्स प्रा. लि. (जी दक्षिण विभाग) - १२,२१,३२,१७३
१०) गोल्डन टोबॅको कंपनी प्रा. लि (के दक्षिण विभाग)- ८,६७,८१,४८८

bmc tax news
Mumbai News: एसएनडीटीत ‘ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परिघ’ पुस्तकाचे प्रकाशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com