palghar election 2024 loksabha
palghar election 2024 loksabhasakal

समीकरणं जुळेना अन् महायुतीचा उमेदवार ठरेना; पालघरच्या उमेदवारीबाबतचा पेच कायम

खासदार राजेंद्र गावित हे २०१९ मध्ये लोकसभेत निवडून आले. त्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीतही ते इच्छुक आहेत|MP Rajendra Gavit was elected to the Lok Sabha in 2019. They are also interested in the upcoming elections

Vasai News: पालघर लोकसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणण्यासाठी तगड्या उमेदवाराच्या शोधात पक्ष आहेत. त्यातच उद्धव ठाकरे गटाने भारती कामडी यांचे नाव जाहीर केले आहे; परंतु शिंदे, भाजप, बहुजन विकास आघाडी यांच्या उमेदवारीचे समीकरण अद्याप जुळले नाही.

भाजपने सर्व्हेचा विचार केला असल्याने हा तिढा त्यानंतर सुटणार की, सुवर्णमध्य साधला जाईल, याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे कोणता उमेदवार बाजी मारणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

palghar election 2024 loksabha
Vasai Virar: शुद्ध हवा कार्यक्रमासाठी ७२ कोटी ३५ लाखांचा निधी

खासदार राजेंद्र गावित हे २०१९ मध्ये लोकसभेत निवडून आले. त्यानंतर होऊ घातलेल्या निवडणुकीतही ते इच्छुक आहेत; मात्र विरोध हा त्यांच्यासाठी नेहमीच मुद्दा राहिला आहे. अगोदरही त्यांना विरोध करण्यात आला आणि ते निवडून आले. येत्या लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा असली, तरी नाव जाहीर झाले नाही.

भाजपने काही जागांवर सर्व्हे मोहिमेचा विचार केला असल्याचे समजते. यात पालघर लोकसभेतही हेच राजकीय समीकरण वापरले जाणार का? तसे झाले तर कोणाला उमेदवारी मिळेल? गावित पुन्हा दुसऱ्या पक्षाच्या तिकिटावर उभे राहतील का? असा चर्चांना उधाण आले आहे

palghar election 2024 loksabha
Vasai Virar News: त्या २९ गावांचा मुद्दा पुन्हा आला ऐरणीवर; वाचा काय आहे प्रकरण

उद्धव ठाकरे गटवगळता अन्य पक्ष पालघर लोकसभेचा उमेदवार केव्हा जाहीर करणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आदिवासीबहुल भागांत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी निम्मे म्हणजे तीन आमदार हे बहुजन विकास आघाडीचे आहेत. त्यामुळे बविआ सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर लोकसभेचा उमेदवार राजकीय मैदानात आणण्याची शक्यता आहे. शिंदे, भाजप, बविआची गुलदस्त्यात असल्याने उमेदवारी जाहीर झाल्यावर अन्य इच्छुकांची भूमिकाही महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे सावध पावले उचलली जात आहेत. दुसरीकडे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असून, उमेदवार जाहीर होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

palghar election 2024 loksabha
Vasai News : वसईत बंद घरात कुजलेले तीन मृतदेह सापडले; गॅस गळतीने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

राजकीय सामना रंगणार


शिवसेना उद्धव ठाकरे गट राजकीय मैदानात उतरली असून उमेदवार जाहीर केले आहेत. शिंदे-भाजप विरुद्ध ठाकरेगट आणि बहुजन विकास आघाडी असा राजकीय सामना रंगू शकतो. मात्र, बविआने उमेदवार दिला नाही, तर महायुती महाविकास आघाडी आमनेसामने येणार आहे.


मतदानाचा कौल कुणाला?


पालघर लोकसभा मतदारसंघात केलेली विकास कामे, असणाऱ्या समस्या, पक्ष, नेतृत्वाचा चेहरा यावर मतदानाचा कौल असू शकतो. ठाकरे गट सोडून अन्य पक्षांचा उमेदवारीचा तिढा काही केल्या सुटत नाही. ऐन उकाड्यात राजकीय वातावरणही तापले असल्याचे दिसून येत आहे.

palghar election 2024 loksabha
Vasai News : वसईत बंद घरात कुजलेले तीन मृतदेह सापडले; गॅस गळतीने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com