Potato News: गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर बटाटे महागले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता

Potato News: गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर बटाटे महागले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता

गुढीपाडवा सणाला बटाट्याला मोठी मागणी असते. या महागाईची झळ सणालाही बसणार आहे.

Vashi Market: आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांचे बजेट काहीसे कोलमडण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात सुरुवातीलाच वाशीतील एपीएमसी बाजारात बटाट्यांची आवक घटल्याने बटाट्याची किंमत वाढली आहे. गुढीपाडवा सणाला बटाट्याला मोठी मागणी असते. या महागाईची झळ सणालाही बसणार आहे.

घाऊक बाजारात २७ ते २८ रुपये किलो असणारा बटाटा किरकोळ बाजारात ३० ते ३५ रुपयांनी विकला जात आहे. सर्वसामान्यांसाठी जरी बटाटे महाग झाले असले तरीही शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या दरवाढीचे स्वागत होताना दिसत आहेत.

Potato News: गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर बटाटे महागले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता
Potato chilla Recipe : बेसन चिला खाऊन कंटाळलात? मग, नाश्त्याला बनवा बटाटा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी


सध्या उन्हाळ्यात वाळवणात बटाटा चिप्स, बटाट्याचा किस, बटाटा पापड, बटाटा मिरगुंड इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी बटाट्याला मोठी मागणी आहे. शिवाय चार दिवासांनी गुढी पाडवा सण आहे; मात्र ऐन मोसमात बटाटा महाग झाल्याने गृहिणींनी वाळवणासाठीचा आपला हात आखडता घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

वेफर्स बनवण्यासाठी लागणाऱ्या बटाट्याची किंमत घाऊक बाजारात २७ ते २८ रुपये किलो इतकी झाली आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून बटाटा येत असतो. या राज्यांतून आवक घटल्याने याचा परिणाम बटाट्यांच्या किमतींवर दिसून येत आहे. आवक घटल्याचे कारण अद्याप स्पष्ट नसून बदलत्या वातावरणाचा फटका बटाट्याच्या पिकाला बसल्यामुळे आवक घटल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.


गुरुवारची एपीएमसीतील आवक
बटाटा - ४३ गाड्या - १९,७५३ गोण्या
कांदा - ८७ गाड्या - १९,००४ गोण्या


एपीएमसीतील दर
कांदा १२ ते १७ रुपये
बटाटा २७ ते २८ रुपये

Potato News: गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर बटाटे महागले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता
Sweet Potato : थंडीच्या दिवसांत रताळे खाणे अतिशय गुणकारी, शरीराला होतील अनेक फायदे

बटाट्याची दरवाढ सामान्य असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांना यातून दोन ज्यादा पैसे मिळण्याची शक्यता आहे. सध्या हवामानात बदल घडत असल्याने त्याचा परिणाम बटाट्याच्या पिकावर झालेला जाणवतो. येत्या काळात आवक सुधारेल आणि बटाट्याच्या किमती स्थिर होतील. सर्वसामान्यांनीदेखील ही बाब लक्षात घेऊन सहकार्य करावे.


- संजय पिंगळे, अध्यक्ष, कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ


------------
महागाईमुळे आधीच हैराण झाले असताना बटाटेदेखील महाग झाल्याने कोणती भाजी करावी, हादेखील प्रश्‍न पडला आहे. शेतकऱ्यांना फायदा होत आहे, हे मान्य असले; तरीही सामान्य गृहिणींना परवडणारे बटाटे महागल्याने काटकसर करून घर खर्च भागवावा लागत आहे. सरकारने ही दरवाढ कमी करावी.


- मेघा आहेर, गृहिणी, वाशी

Potato News: गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर बटाटे महागले; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता
District Onion-Potato Election : हिरे बंधूंसह धनवटे, कुंभार्डे, घुगे, गुळवे, डोखळे यांचे अर्ज दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com