thane liqure news
thane liqure news sakal

अबब! ठाणे जिल्ह्यात दारूचा खप वाढला; खपात ६५ लाख लिटरची वाढ!

वाइन पिणाऱ्यांच्या संख्येत मात्र घट झाली असून यंदा ५,१८५ लिटरने वाइनचा खप कमी झाला आहे | However, there has been a decrease in the number of wine drinkers and the consumption of wine has decreased by 5,185 liters this year


राजीव डाके, सकाळ वृत्तसेवा


Thane News: जिल्ह्यात दारूचा खप वाढू लागला आहे. यंदा ठाणेकरांनी १३ कोटी एक लाख ६४ हजार १०८ लिटर दारू, बियर आणि वाइन रिचवली आहे. गेल्यावर्षी १० कोटी १० लाख ३० हजार ३७६ लिटर दारू, बियर आणि वाइन ठाणेकरांनी प्यायली होती.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा दारू आणि बियर पिणाऱ्यांमध्ये ६५ लाख ३२ हजार ८३२ लिटरची वाढ झाली आहे. तर वाइन पिणाऱ्यांच्या संख्येत मात्र घट झाली असून यंदा ५,१८५ लिटरने वाइनचा खप कमी झाला आहे.

thane liqure news
Thane News: शेअर रिक्षांच्या भाडेवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी, रद्द करण्याची मागणी

दारू, बियर, वाइन पिणे आता सामान्य होऊ लागले आहे. पूर्वी या पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना समाजाच्या नजरा चुकवाव्या लागत असत; पण आता शहरात, गावखेड्यात वाइन शॉप, बियर बार, बार अँड रेस्टॉरंट, दारूच्या गुत्त्यांची संख्या वाढली आहे.

सरकारी परवाना घेऊन व्यापारी या पदार्थांची विक्री करीत आहेत. सगळीकडे विक्रीची ठिकाणे वाढली आहेत. लोकांची मागणी वाढल्याने दुकानेही वाढली आहेत. तरुणाईदेखील केवळ फॅशन म्हणून या पदार्थांचे सेवन करू लागली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दारू, बियर पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

thane liqure news
Thane News: दवाखान्यात पत्नी अचानक पडली आजारी, संतापलेल्या पतीने घेतला डॉक्टरांना चावा

ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०२२-२०२३ या वर्षात ठाणेकरांनी २३ कोटी ११ लाख ९४ हजार ४८४ लिटर दारू, बियर आणि वाइन रिचवली आहे. विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये बियर पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बियरप्रेमी ४५ लाख ६६ हजार ५३७ लिटर जास्तीची बियर प्यायले आहेत. तर त्यामागोमाग दारू पिणाऱ्यांनी विदेश दारूला पसंती दिली आहे.

२०२२-२३च्या तुलनेत २०२३-२४ या वर्षात १५ लाख ९२ हजार ७४१ लिटर जास्त विदेशी दारू प्यायले आहेत. तर देशी दारू तिसऱ्या स्थानी आहे. २०२२-२३च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये देशी दारू पिणाऱ्यांनी तीन लाख ७३ हजार ५५४ लिटरची वाढ केली आहे. वाइन पिणाऱ्यांनी मात्र २०२२-२३च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये काहीशी नापसंती दिली आहे. या वर्षी ५,१८५ लिटरने वाइनच्या खपात घसरण झाली आहे.

thane liqure news
Thane Loksabha: राजन विचारेंच्या विरोधात शिंदेंचा शिलेदार ठरला?

किती झाली विक्री?
प्रकार २०२२-२३ २०२३-२४ (खप लिटरमध्ये)
देशी मद्य - २,३०,२६,५२२ २,३४,००,०७६
विदेशी मद्य - २,९६,४६,८२१ ३,१२,३९,५६२
बियर - ४,७१,६४,७८३ ५,१७,३१,३२०
वाइन - ११,९२,२५० ११,८७,०६५


अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असते. विशेष पथकांच्या माध्यमातून अशा लोकांवर कारवाई केली जाते. अवैध मद्य वाहतूक, विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे.

अनेकांवर एनपीडीएअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. नाक्यांवर २४ तास पथके तैनात असतात. त्यामुळे अनधिकृत कृत्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. परिणामी, अधिकृत विक्रीत वाढ झाल्याचे दिसते आहे.


- डॉ. नीलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, ठाणे

thane liqure news
Thane Lok Sabha 2024: राजन विचारेंविरुद्ध शिंदेंचा शिलेदार ठरला? ईडीच्या रडारवर आलेल्या आमदारालाच संधी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com