Badlapur News: बदलापूरच्या बॅरेज धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
badlapur news sakal

Badlapur: बदलापूरच्या बॅरेज धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Badlapur | सोशल मीडियावरील या धरणाचे व्हायरल झालेले रिल काढून टाकण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Badalapur: शहरातील पश्चिम परिसरातील बॅरेज धरणात अनुप गोसावी या १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.९) दुपारी घडली. हा युवक परळ, मुंबई येथे राहत होता.

त्याच्यासोबत त्याचे इतर ६ मित्रही पोहण्याचा आनंद घेण्यासाठी बॅरेज धरण येथे आले होते. यावेळी दोन लहान मुले पाण्यात बुडताना उपस्थितांच्या निदर्शनास आले, त्यावेळी अनुप गोसावी याने त्या बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवले, मात्र त्याला स्वतःचा जीव गमवावा लागला.

Badlapur News: बदलापूरच्या बॅरेज धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
Badlapur News : अखेर लोडशेडींग मधून बदलापूरकर मुक्त होणार; आमदारांच्या प्रयत्नांना यश!


बदलापूर पश्चिम येथील बॅरेज धरण येथे अनुप गोसावी व त्याचे इतर सहा मित्र पोहण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना तिथे दोन लहान मुले बुडत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांचा जीव वाचवण्यासाठी अनुपने पाण्यात उडी घेतली आणि दोन मुलांना वाचवले.

मात्र यावेळी अनुपला पाण्याचा अंदाज न आल्याने अनुप पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिस विभगातील सुनील संकपाळ व सुरेश पादीर यांनी व अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांच्या नेतृत्वाखाली अनुपचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

Badlapur News: बदलापूरच्या बॅरेज धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
Youth Drown : प्रवरा पात्रालगतच्या तलावात बुडून दोघांचा मृत्यू! सिन्नरमधील एकाचा समावेश

व्हायरल रिल्समुळे अजून किती बळी जाणार?


बदलापूर पश्चिम येथील बॅरेज धरण हे पर्यटनाच्या दृष्टीने पिकनिक स्पॉट झाले आहे. त्याचे कितीतरी व्हिडीओ, ब्लॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही झाले आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले पर्यटक येथे पोहण्याचा आनंद घेतात, मात्र येथे येणाऱ्या प्रत्येकालाच पाण्याचा अंदाज येतोच असे नाही, त्यामुळे सोशल मीडियावरील या धरणाचे व्हायरल झालेले रिल काढून टाकण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Badlapur News: बदलापूरच्या बॅरेज धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
River Linking Project : विधानसभेपूर्वी एकदरे-वाघाड नदीजोड प्रकल्पास मान्यता शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com