

Matunga railway Workshop fire
ESakal
माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एलएचबी स्लीपर कोचला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. माटुंगा कारशेड येथे ही घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी डब्याचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १५:१० वाजता स्लीपर कोचमध्ये अचानक आग लागली.