Big News -  'या' महापालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या.. 

Big News -  'या' महापालिका आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या.. 

मुंबई - राज्यात विविध पालिका आयुक्तांच्या तकडाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री राज्याच्या नगरविकास विभागकडून हा बदल करण्यात आला. त्यात पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदाची धुरा उल्हासनगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. याआधी पनवेल महापालिका आयुक्तपदाची धुरा गणेश देशमुख यांच्या हातात होती. आता गणेश देशमुख यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी नवे आयुक्त सुधाकर देशमुख पदभार स्विकारणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.

एकीकडे सध्या कोरोना व्हायरला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पालिका प्रशासनातले अधिकारी कोरोनावर मात करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यातच गणेश देशमुख यांची बदली केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. गणेश देशमुख यांच्यावर रायगडचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार नाराज होते. देशमुखांनी कोरोन संसर्गादरम्यान घेतलेले काही निर्णय हे त्या नाराजीमागचं कारण होतं. स्वतः पालकमंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लेखी नाराजी व्यक्त केली होती. 

कोरोना लढतीतलं गणेश देशमुखाचं कार्य 

मुंबईतील अत्यावश्यक सेवेकरींना तिथेच राहण्याची सोय करावी, यासाठी भाजपनं पनवेल बंदची हाक दिली होती. त्याविरोधात सनदशीर मार्गाने आयुक्त गणेश देशमुख यांनी त्याचा विरोध केला होता. तसंच पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांसाठी विविध इमारती, मोकळ्या जागा आणि रुग्णांलयांमध्ये 2700 खाटांचे नियोजन गणेश देशमुख यांच्याकडून करण्यात आलं आहे. 

एप्रिल 2018 ला पालिकेचा कारभार स्विकारणारे आयुक्त गणेश देशमुखांनी त्यावेळी सिडको महामंडळाकडून आरोग्य आणि स्वच्छता सेवा हस्तांतरण, पनवेल एसटी डेपोसमोरील अतिक्रमन हटवणं, पालिका क्षेत्रातील जमिनी आणि मालमत्तांचे सर्वेक्षण करणे, पालिकेच्या सिडको क्षेत्रातील रहिवाशांकडून मालमत्ता कर वसूलीसाठी संपूर्ण प्रणाली राबविणे, रस्ते सुसज्ज करणे, कॉक्रीटीकरण, वडाळे आणि देवाळे तलावाचा विकास करणं अशी महत्वाची काम गणेश देशमुखांच्या नावावर आहेत. 

शहराचा नियोजन आराखड्याचे काम तत्कालीन गणेश देशमुख यांनी अंतिम टप्यात आणलं होतं. गेल्या अतिवृष्टीत पनवेल पाण्याखाली गेलं होतं. त्यानंतर देशमुख यांनी तब्बल शंभर कोटी रुपयांचा आपत्ती व्यवस्थापनाची कामे हाती घेतली होती.

नागरिकांकडून त्यांच्या कामाचं कौतूक 

कोरोनाविरुद्ध लढताना तब्बल 40 दिवसात एकही साप्ताहिक सुट्टी न घेणारे आयुक्त गणेश देशमुख हे राहत असलेल्या खारघर येथील इमारतीमध्ये पाच रुग्ण कोरोनाचे आढळले, तरीही त्यांनी काम करणं बंद केलं नाही. त्यामुळे स्वच्छ खारघर सारख्या समाजमाध्यमांच्या गटावर त्यांच्या कार्याची नागरिकांनी स्तुती केली होती.\

transfer of municipal commissioner admid corona virus read full report

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com