esakal | 'सकाळ'च्या बातमीचा इम्पॅक्ट; एसटीतील 'त्या' अधिकाऱ्यांची मुदतवाढ मंत्र्यांनी नाकारली...
sakal

बोलून बातमी शोधा

msrtc

राज्य शासनाच्या उपसचिव पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या माधव काळे यांची तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटी मध्ये 2016 मध्ये प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले होते.

'सकाळ'च्या बातमीचा इम्पॅक्ट; एसटीतील 'त्या' अधिकाऱ्यांची मुदतवाढ मंत्र्यांनी नाकारली...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई :  राज्य शासनाच्या उपसचिव पदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या माधव काळे यांची तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात एसटी मध्ये 2016 मध्ये प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले होते. त्यानंतर काळे यांची राज्य शासनातील नियुक्तीनंतर सुद्धा एसटीमध्ये आपला जम बसवला होता. रावते यांच्या कार्यकाळातील चालक-वाहक पद भरती, ब्रिक्स कंपनीला दिलेले 450 कोटीतील स्वच्छतेचे कंत्राट, रोल्टा कंपनीला दिलेले 88 कोटीचे कंत्राट यासह अनेक कंत्राट आणि भरती प्रक्रीयेमध्ये काळे यांच्यावर कर्मचारी संघंनांनी भ्रष्टाचारांचे आरोप केले आहे. 

वाचा ः यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पूर्वपरीक्षेची तारीख...

एसटी महामंडळातील कर्मचारी व औद्योगीक संख्या विभागाच्या महाव्यवस्थापक पदावर कार्यरत माधव काळे यांना परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी मुदवाढ नाकारली आहे. 31 मे रोजी एक वर्षांच्या कार्यकाळाची मुदतवाढ संपल्यानंतर अधिकार नसतांना 1 जून रोजी एसटीचे परिपत्रक काळे यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर अधिकार नसताना अनधिकृत परिपत्रक प्रकरण 'सकाळ'ने लावून धरल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी काळे यांची मुदतवाढ नाकारली आहे.

वाचा ः योग्यवेळी उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा वाचला जीव! सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने यंत्रणा तत्काळ हलली

मात्र, आता सकाळ ने 2 जून रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीनंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी काळे यांना मुदतवाढ नाकारली असून, एसटीतील उपमहाव्यवस्थापक शैलेश चव्हाण यांची तात्पुरती बदली करून चव्हाण यांना कर्मचारी वर्ग या पदाचे उपमहाव्यस्थापक म्हणून पदभार देण्यात आला आहे. तर यंत्र अभियंता विभागाचे महाव्यवस्थापक रघुनात कांबळे यांच्याकडे नियोजन व पणन महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर भांडार विभागाचे उपमहाव्यवस्थापक बाबाजी कदम यांना भांडार व खरेदीचे महाव्यवस्थापक पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.  

वाचा ः निर्बंधातून बाहेर पडत नेस्लेच्या मॅगीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद; गेल्या वर्षांत झाली 'इतकी' विक्री...

मातोश्रीचे उंबरठे झिजवले
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात माधव काळे 2016 मध्ये कर्मचारी व औद्योगीक संस्था पदासाठी एसटीमध्ये प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये नियोजन व पणन या महाव्यवस्थापक पदाचा अतिरीक्त कार्यभार सुद्धा काळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. 31 मे 2019 रोजी राज्य शासनातून सेवा निवृत्त झाले. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने कार्यभार एसटी महांडळातील कर्मचारी व औद्यागीक संबंध या पदाचा अधिकृत पदभार सांभाळत नियोजन व पणन या पदाचा सुद्धा अनधिकृतरित्या कारभार सांभाळला. त्यानंतर आता 31 मे रोजी कंत्राटी पदाच्या नेमनुकीचा कालावधी संपल्यानंतरही मुदवाढीसाठी काळे यांचे प्रयत्न सुरू होती. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्य मातोश्रीवर सुद्धा एका माजी मंत्र्यांच्या माध्यमातून लॉबिंग सुरू असल्याची चर्चा होती.

वाचा नेमकं प्रकरण काय होतं ः अधिकारात नसताना काढले अनधिकृत परिपत्रक; 'एसटी' महाव्यवस्थापकाचा 'महागैरकारभार' चव्हाट्यावर!

loading image
go to top