केंद्र आणि राज्य सरकाराच्या संयुक्त आर्थिक भागिदारीने रोप वे विकसित करण्याचा मानस असून यासंदर्भातील विकास आराखडा तयार करुन तत्वत: मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, असेही सरनाईक यांनी सांगितले.
मुंबई : रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून सविस्तर विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने या प्रकल्पाची आवश्यकता मांडण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी दिली.