

Pratap Sarnaik
ESakal
मुंबई : मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसलेल्या रिक्षा-टॅक्सीचालकांना प्रथम एक महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. या कालावधीत मराठीचे ज्ञान प्राप्त न केल्यास त्यांचा बॅज तीन महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे. त्यानंतरही मराठी शिकण्यास जाणीवपूर्वक नकार दिल्यास बॅज आणि परवाना रद्द करण्यात येईल, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी (ता. १९) दिली.