

School canteen Vada pav Samosa banned
ESakal
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून अमली पदार्थ तसेच अन्न भेसळविरोधात राज्यभरात धडक कारवाया केल्या जात आहेत. एफडीए प्रशासनाकडून धाड टाकून अनेक आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे अन्नभेसळ करणाऱ्यांसह अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याचसोबत राज्यभरातील शाळांच्या ५० मीटर परिसरात कॅलरी वाढवणारे पदार्थ विकले जाऊ नये, या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबईतील शाळांच्या कँटीनमध्ये मोठा बदल झाल्याची महिती समोर आली आहे