Tukaram Mundhe: बिकेसीमधील MCAच्या क्लबवर FDAची कारवाई, रेस्टॉरंट तात्पुरते बंद

FDA Action: बिकेसीमधील 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या क्लबवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर केंद्राचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

esakal

Updated on

मुंबई : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्नपदार्थांच्या भेसळविरोधात धडक कारवाया सुरु आहेत. यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. नुकतेच एफडीकडून मुंबईत धडक कारवाई करत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ आस्थापनांचे परवाना निलंबित करण्यात आला. त्यांनतर आता 'मुंबई क्रिकेट असोसिएशन'च्या (MCA) वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) केंद्राचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com