esakal | मुंबई-गोवा महामार्गावर १३ वर्षांत अडीच हजार बळी
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई-गोवा महामार्गावर १३ वर्षांत अडीच हजार बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा (Mumbai-Goa) महामार्गाच्या (Express Way) रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या १३ वर्षांत या मार्गावर २,५०० हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. मोठमोठे खड्डे, चिखल-मातीचे साम्राज्य, उड्डाणपुलांची झालेली दुरवस्था, निकृष्ट कामांविरोधात मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली असून उद्या, ३ सप्टेंबर (September) रोजी कोकण भवन (Kokan Bhavan), बेलापूर (Belapur) येथील कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन देऊन जाब विचारला जाणार आहेत.

गणेशोत्सवात चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जातात. मात्र खड्डेमय रस्त्यांमुळे त्यांचा प्रवास खडतर होतो. शिवाय खड्ड्यांतून मार्ग काढताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागते. त्यामुळे यंदा गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या डागडुजी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात येते आहे. मनसेच्या रस्ते आस्थापना विभागाने थेट नितीन गडकरी यांना पत्र लिहून जाब विचारला आहे.

हेही वाचा: देशात 75 हजार हेक्टरवर औषधी वनस्पतींची लागवड होणार

देशात इतर ठिकाणी १८ तासांत २५ किलोमीटर महामार्गाची निर्मिती करणारे आपण मुंबई गोवा महामार्गासमोर मात्र अगतिक झाल्याचे दिसत असल्याचे मनसेने आपल्या पत्रात नमूद केले आहे. कंत्राटदार, अधिकाऱ्यांच्या १,७०० कोटींच्या भ्रष्टाचारामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.

loading image
go to top