दुहेरी हत्याकांडाने मीरा रोड हादरले; दोन हॉटेल कर्मचाऱ्यांना धाडले यमसदनी...

crime scene
crime scene
Updated on

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात मुंबईतल्या मीरारोडमध्ये दुहेरी हत्याकांड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका बारमधल्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. एवढंच काय तर या दोन कर्मचाऱ्यांचा मृतदेह बारमधल्या पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. या दुहेरी हत्याकांडानं मीरारोड परिसर हादरला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मीरारोडच्या शीतल नगरमध्ये एमटीएनएल मार्गावर शबरी बार अँड रेस्टॉरंटमध्ये दोन कर्मचारी काम करत होते. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या दोन्ही कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती सदर बारच्या मालकानं मीरारोड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचे मृतदेह टाकीत आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी हे दोन्ही मृतदेहबाहेर काढण्यात आले आणि त्यांची ओळख पटवण्यात आली. 

रेश पंडित (52) आणि हरेश शेट्टी (48) अशी हत्या झालेल्यांची कर्मचाऱ्यांची नावं आहेत. हे दोघेबी शबरी बारचे कर्मचारी होते. बार मालकानं पोलिसांना या दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळाल्यावर ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी हे घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही कर्मचाऱ्यांच्या शरीरावर आणि डोक्यावर जखमा आढळल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. दोघांची हत्या का आणि कोणी केला याबाबतची पोलिसांनी चौकशी करण्यास सुरु केली आहे.  लॉकडाऊनमध्ये मीरारोडमध्ये झालेल्या या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

वाचा ः ...भारतात 'यासाठी' व्हिडिओ पाहणाऱ्यांचे प्रमाण जास्त!
 
पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना याबाबतचं कळवण्यात आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिस सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी बार मालकासह इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करताहेत. तसंच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस अधिक तपास करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com