

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाठिंबा दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयाने ठाकरे बंधूंच्या युतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या प्रकरणावर तीव्र टीका केली.