Uddhav Thackeray : "गुडघे टेकवायला आणि पालख्या वाहायला..." ; उद्धव ठाकरे शिंदेंवर कडाडले

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी जागर मराठी भाषेचा या कार्यक्रमात संबोधित केले. ठाकरे गटाचे नेते या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला. शिंदे गट उद्या माझ्या घोषणा देखील चोरेल. काहीही चोरता येतं पण संस्कार चोरता येत नाहीत. 

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, या घोषणेने उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. ही घोषणा देखील शिंदे गट चोरेल. यावरही दावा टाकला जाईल. वडील देखील पाहीजेत, आजोबा देखील पाहीजेत, असे म्हटल्या जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

Uddhav Thackeray
Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियानंतर KCR च्या मुलीला होणार अटक?, वाचा काय आहे प्रकरण

उद्धव ठाकरे म्हणाले, "मला चिंता कधीच नव्हती की माझं काय होणार. शिवसेनेच्या परंपरेत कधीही खंड पडला नाही. मातृभाषा म्हणजे आईची भाषा, त्या भाषेतून एक संस्कार येतो. हे संस्कार चोरता येत नाही. ज्याच्यावर संस्कार नसतात त्याला चोरीला माल लागतो. स्वत:च्या आई-वडीलांना अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई-वडील चोरणाऱ्यांना काय म्हणायचं?. मेरा पुरा खानदान चोर है, असे हे गद्दार स्वत:च्या हाताने त्यांच्या कपाळावर लिहीतात. पण ठाकरे कसे चोरणार?."

Uddhav Thackeray
Raj Thakceray: एकमेव आमदारानं पक्ष ताब्यात घेतला तर? राज ठाकरेंनी दिलं उत्तर

"बाळासाहेबांनी मला गुडघे टेकवायला आणि पालख्या वाहायला शिकवलं नाही. जगाल तर आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगा, हा विचार बाळासाहेबांनी आम्हाला दिला आहे. या संकटात मी संधी शोधणार आहे," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Chatrapti Sambhaji Nagar: अखेर जिल्ह्यांचही झालं नामांतर! 'छत्रपती संभाजीनगर', 'धाराशीव'चं निघालं नोटीफिकेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com