...तर येणारी लोकसभा निवडणूक शेवटची ; जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक! - Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ..तर येणारी लोकसभा निवडणूक शेवटची ; जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आक्रमक!

राज्यातील ठाकरे गटाच्या प्रमुखांची आज महत्वाची बैठक पार पडली. संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक सेनाभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना महत्वाच्या सुचना दिल्या. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 

उद्धव ठाकरे पत्रकारांना म्हणाले, "तुम्ही माझ्याकडे का आलात कारण माझे नाव देखील चोरले आणि चिन्ह देखील चोरले आहे. हा पूर्वनियोजीत कट होता."

मी बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो आहे. हे भाग्य शिंदे गटाला मिळणार नाही. हे भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाहीत. देशात चोरांना राज प्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अयोग्य आहे. जी परिस्थिती आज शिवसेनेवर आहे ती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर असेल. याचा सामना आता केला नाहीत तर कदाचीत येणारी २०२४ ची निवडणूक शेवटची असावी. कारण त्यानंतर हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर देखील प्रश्न उपस्थित केले. सर्वात वादग्रस्त निवडणूक आयुक्त पदावर आहेत. निवडणूक आयोगाला घाई करण्याची गरज नव्हती, गुंता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्णय दिला? असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेना नावासह धनुष्यबाण चोरणे पूर्वनियोजित होते. शिवसेना नाव चोरले तरी ठाकरे नाव चोरू शकत नाही. घटनेनुसार शिंदे गट अपात्र ठरला गेला पाहीजे. तसेच निवडणूक आयोग बरखास्त करावा, अशी माझी मागणी आहे, निवडणूक आयोगाला पक्षाच्या निधीवर डल्ला मारण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोग सुलतान नाही. निवडणूक आयोगाच्या देखील निवडणुका व्हायला हव्यात. मला शरद पवार, ममता बॅनर्जी अनेक नेत्यांना फोन आला होता. हे प्रकरण आता देशभर पेटेल.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray