
Mumbai Latest News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिल्याने मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मुंबई महापालिकेवर पुन्हा भगवा फडविण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.
‘मातोश्री’ येथे नुकत्याच झालेल्या ठाकरे गटाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वळावर लढण्याचा आग्रह धरला होता. शिवसैनिकांची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजून घेतली. त्यानुसार मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे खासदार सजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार नसल्याने कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आल्याचे समजते.