esakal | Video : अविश्वसनीय असं करून दाखवणार : उद्धव ठाकरे  
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray speaks with Media after visiting MP Sanjay Raut

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल (ता. 11) अँजिओप्लास्टी झाली. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते त्यांना भेटण्यास लीलावती रूग्णालयात जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रोहित पवार, भाजप नेते आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांनी राऊतांची लीलावतीमध्ये जाऊन भेट घेतली. 

Video : अविश्वसनीय असं करून दाखवणार : उद्धव ठाकरे  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लीलावतीत दाखल असलेल्या संजय राऊतांची भेट घेऊन मातोश्रीवर परतत असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी आता काहीतरी अविश्वसनीय करून दाखवू, तुम्ही असे बाहेर उभे राहू नका, आमचं काही ठरलं तर मी तुम्हाला बोलवीन असे उद्धव यांनी सांगितले. त्यामुळे आता काय नवीन सत्तासमीकरण बघायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

संजय राऊतांच्या भेटीसाठी शरद पवार लीलावतीत दाखल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल (ता. 11) अँजिओप्लास्टी झाली. त्यामुळे आज सर्वपक्षीय नेते त्यांना भेटण्यास लीलावती रूग्णालयात जात आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, रोहित पवार, भाजप नेते आशिष शेलार, हर्षवर्धन पाटील यांनी राऊतांची लीलावतीमध्ये जाऊन भेट घेतली. 

'कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती'; राऊतांचे थेट लीलावतीतून ट्विट

राज्यापाल भगतसिंह कोशियारी यांनी शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेली मुदत काल (ता. 11) संध्याकाळी साडेसातला संपली. त्यापूर्वीच साधारण दुपारी चारच्या दरम्यान संजय राऊत यांना लीलावती रूग्णालयात रूटीन चेकअपसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. राऊतांनी हरप्रकारे धडपड करून त्यांना सत्तास्थापन करण्यात अपयश आले. मात्र आज शरद पवारांनीही त्यांची भेट घेतली, यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादीला बहुमत सिद्ध करण्यासाठी आज संध्याकाळी साडेआठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.    

संजय राऊत यांच्या प्रकृतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी