

Ulhasnagar Municipal Corporation
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महिला दिन कार्यक्रमावर तब्बल २२ लाख रुपयांचा खर्च झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. अवघ्या तीन तासांच्या कार्यक्रमासाठी इतका मोठा खर्च कसा झाला, असे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. याबाबत एका सूझ नागरिकाने माहितीच्या अधिकारातून मागविलेल्या माहितीनंतर लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याचे उघड झाले आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना अशा उधळपट्टीने प्रशासन अडचणीत आले आहे.