विजेचे अधिकृत कनेक्शन असलेल्या गणेशोत्सव मंडळांनाच परवाना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

उल्हासनगरः पूर्वीच्या अटीशर्ती मध्ये विजेचे अधिकृत कनेक्शन हि नवीन अट लावण्यात आली आहे. कनेक्शन तरच गणेशोत्सव मंडळांना परवाना देण्यात येणार आहे. त्यासाठी एमएसईबीचे अधिकारी उल्हासनगर महानगरपालिके मध्ये उपस्थित राहत आहेत.

उल्हासनगरात पालिकेच्या नोंदवहीत 216 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत.पूर्वी पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दल यांच्या परवाण्या आवश्यक होत्या. आता या अटीशर्ती मध्ये विजेचे अधिकृत कनेक्शन हि नवीन अट जोडण्यात आली आहे. जे सार्वजनिक मंडळे आहेत, त्यांनी त्यांच्या मंडळाच्या नावांवर मिटरचे कनेक्शन घ्यावे. तरच परवाना देण्यात येणार आहे.

विजेच्या मीटरचे कनेक्शन देण्यासाठी प्रदिप चौधरी, संजय देशपांडे, काशिनाथ भालेराव, नेहा ढोणे, अश्विनी भांगरे, पूर्णिमा वळवी आदी एमएसईबीचे अधिकारी उल्हासनगर पालिकेत हजर राहत आहेत.

गणेशोत्सव मंडळे इकडून तिकडून किंबहुना मंडपा जवळ राहत असलेल्या ओळखीच्या व्यक्ती कडून वीज घेत होते. आता मात्र गणेशोत्सव मंडळाचे स्वतंत्र मिटर असणार असल्याने एमएसईबीला दहा दिवसांचे बिल मिळणार आहे. त्यासाठी लहान मिटर करिता दोन हजार व मोठ्या मिटर साठी पाच हजार रुपये अनामत रकम घेण्यात येत आहेत.

आजपर्यंत 220 च्या आसपास गणेशोत्सव मंडळांचे मंडप परवानगीसाठी अर्ज आलेले आहेत. मात्र, ज्या मंडळांकडे वीज मीटरच्या कनेक्शनचा परवाना असणार. अशाच मंडळांना रितसर मंडप परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती मालमत्ता व्यवस्थापक विशाखा सावंत यांनी दिली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
राज्यभर संततधार 
मोबाईल, गेम हिरावतोय लहानग्यांची दृष्टी!
बारामतीची साखर अन्‌ राज्यात पाऊस!
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
खंडाळ्याजवळ हुबळी एक्स्प्रेसवर दरड कोसळली
नकुशी बनली विश्‍वचषक विजेती
मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण
केईएमच्या दारी नंदीबैलाची स्वारी 

Web Title: ulhasnagar news ganeshotsav electricity meter and permission