उल्हासनगरच्या सर्वात 'तरूण' आयुक्तांची कोव्हिडवर मात करण्यासाठी खास 'रणनिती'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

उल्हासनगरात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी 1500 च्या वर गेली आहे. त्यात काही नगरसेवक, पोलिस, पालिका अधिकारी, कर्मचारी, शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर्स, परिचारीका कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेची स्थापना 1996 साली झाली आहे. तेव्हापासून या 24 वर्षांत तब्बल 44 आयुक्तांनी पदभार हाताळला आहे. त्यात नव्याने आयुक्त पदावर आलेले 31 वर्षीय आयएएस अधिकारी डॉ. राजा दयानिधी हे महापालिकेचे सर्वात तरूण आयुक्त ठरले आहेत. डॉ. दयानिधी हे स्वतः एमबीबीएस असल्याने आरोग्य यंत्रणा सुधारण्याचे व कोव्हिड रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी त्यांनी सुरवातीलाच कोव्हिडवर मात करण्यासाठी रणनिती आखायला सुरवात केली आहे.

मोठी बातमी - मुंबईत कोरोना संक्रमणाची बाधा आणि प्रसाराचीही होणार उकल, आणखी १० हजार व्यक्तींवर होणार 'हे' सर्वेक्षण..

डॉ. राजा यांनी पालिकेत पहिले पाऊल टाकताच त्यांनी उल्हासनगर पालिकेत कोव्हिडचे काम करणारे मदन सोंडे, विकास चव्हाण, मंगेश गावडे, गणेश शिंपी, मनिष हिवरे, अजयकुमार एडके, तुषार सोनवणे, अजित गोवारी यांच्यासोबत बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला. शासकीय, रेडक्रॉस, सत्यसाई प्लॅटिनम या कोव्हिड रुग्णालयांची पीपीई किट्स घालून पाहणी केली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुहास मोहनाळकर, डॉ. राजा रिझवानी, मुख्य स्वच्छता अधिकारी विनोद केणे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये दिसून येतंय 'हे' नवीन लक्षण, डॉक्टर्स देखील झालेत हैराण..

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान 
उल्हासनगरात कोरोना रुग्णांच्या आकडेवारी 1500 च्या वर गेली आहे. त्यात काही नगरसेवक, पोलिस, पालिका अधिकारी, कर्मचारी, शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर्स, परिचारीका कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. स्वतः डॉक्टर असलेल्या या सर्वात यंग आयुक्तांसमोर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आहे.

हेही वाचा : कोरोना मागोमाग लागूनच मुंबईवर येऊ शकतं 'हे' मोठं संकट; मुंबईकरांना वाचवणार आता एकच गोष्ट...

गोंदिया कोरोनामुक्त करण्यात मोठे योगदान
डॉ. दयानिधी हे 2014 मधील बॅचचे आयएएस अधिकारी असून एमबीबीएस केल्यावर त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन नंतर आयएएस झाले. उल्हासनगरमध्ये येण्यापूर्वी डॉ. राजा हे गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. स्वतःच डॉक्टर असल्याने गोंदियाला कोरोनामुक्त करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Ulhasnagar's youngest commissioners have special strategy to defeat covid


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ulhasnagar's youngest commissioners have special strategy to defeat covid