लॉकडाऊननंतर 'या' व्यवसायाला अच्छे दिन; लोक अक्षरशः तुटून पडतायेत

लॉकडाऊनमध्येही 'या' व्यवसायाला अच्छे दिन; लोक अक्षरशः तुटून पडतायेत
लॉकडाऊनमध्येही 'या' व्यवसायाला अच्छे दिन; लोक अक्षरशः तुटून पडतायेत

रायगड : चिकन व अंडी खाल्ल्याने कोरोनाची लागण होते, या अफवेमुळे अनेकांनी चिकन आणि अंडी वर्ज्य केली होती; मात्र याबाबत सरकार आणि कुक्कुटपालन शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यातच 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये मांसाहारप्रेमींचे पुरते हाल झाले. चिकन-मटण मार्केट उघडल्याने आता बहुसंख्य लोक चिकन व अंड्यांवर अक्षरशः तुटून पडत आहेत. त्यामुळे चिकन आणि अंड्यांचे पडलेले भाव पूर्ववत होत आहेत.

कोरोनामुळे येथील चिकन व पोल्ट्री व्यावसायिक अक्षरशः देशोधडीला लागले आहेत. मांसाहार केल्याने हा व्हायरस अधिक पसरतो अशी अफवा पसरवणारे मेसेज मागील महिन्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. यामुळे जिल्ह्यात अंडी व चिकनच्या विक्रीत 60 ते 80 टक्क्यांनी घट झाली होती. 160 रुपये किलो असलेले चिकन 60 ते 80 रुपये किलोने मिळत होते. काही पोल्ट्रीचालकांनी जिल्ह्यात एक ब्रॉयलर कोंबडी 20 रुपयांना विकली. काहींनी फुकटातही वाटल्या. दरम्यान, सोशल मीडियामध्ये चिकन आणि अंडी खाल्ल्याने कोरोना पसरतो अशा फिरत असलेल्या या पोस्ट्सना शास्त्रीयदृष्ट्या कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण शासन व अनेक तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी दिले. कुठलाही विषाणू साधारण 27 ते 45 डिग्रीपेक्षा अधिक तापमानात जगत नाही.

आजपर्यंत मासळी, चिकन-मटणातून एखाद्या विषाणूजन्य रोगाची बाधा झाल्याच्या भारतात नोंदी नाहीत. चांगला शिजवलेला मांसाहार खाण्यासाठी पूर्णत: सुरक्षित आहेत, असे कुक्कुटपालनशास्त्र डॉ. अजित रानडे यांनी पुष्टी दिली होती. यातच 21 दिवसांपूर्वी मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. आधीच अनेकांनी मांसाहार वर्ज्य केलेले त्यातच लोकडाऊनचा कालावधीत चिकन आणि अंडी मिळणे दुरापास्तच झाले. एकीकडे चिकन आणि अंडी खाल्ल्याने कोरोना होत नाही याची खात्री लोकांना झाली. आणि मग काय! चिकनची दुकाने खुली झाल्यावर खवय्यांनी चिकन आणि अंडी खरेदीकडे आपला मोर्चा वळविला आहे. परिणामी मागणी वाढल्याने चिकनचे भाव पूर्वस्थितीत म्हणजे (130 ते 160 रुपये) आले आहेत. अंडी मात्र आहे त्या 5 रुपये भावाने मिळत आहेत. त्यामुळे चिकन व अंडी विक्रेते आणि पोल्ट्री व्यावसायिक मात्र सुखावले आहेत. 

ही बातमी वाचली का? नवी मुंबईत दोन पोलिस जखमी

नुकतेच चिकन मार्केट उघडण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. चिकनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही याची लोकांना खात्री झाली आहे. अशातच मासळी मिळत नाही आणि मटणाचे भाव खूप वधारले आहेत. परिणामी लोक चिकन खरेदीकडे वळले आहेत. चिकनचा भाव आता पूर्ववत होत आहे.
- हेमंत राऊत, चिकन विक्रेते, पाली

कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला लागला आहे. चिकन मार्केट सुरू झाल्याने व चिकनबाबत कोरोनाची अफवा मिटल्याने कोंबड्यांची उचल होत आहे. त्यामुळे आता बाजार पुन्हा सुस्थितीत येईल अशी आशा वाटते.
- संतोष बावधाने, पोल्ट्रीचालक, सुधागड

चिकन आणि अंड्यांबाबत पसरत असलेल्या अफवा फोल आहेत. यातच लॉकडाऊनमुळे मांसाहार मिळणे बंद झाले. मात्र, चिकन आणि अंडी खाणे पसंत करत आहे.
- दिलीप सोनावणे, नागोठणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com