Mhada House : म्हाडा मुंबईच्या घरांसाठी केंद्रीय मंत्र्यांसह आमदारही रांगेत, अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचाही अर्ज

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत यंदाच्या वर्षी सर्वाधिक म्हणजे ७ कोटींहुन अधिक किमतीची घरे विक्रीसाठी
Dr. Bhagwat Karad
Dr. Bhagwat Karad sakal

मुंबई : मुंबईत घर असावं असे सर्वसामान्य नागरिक ते सेलिब्रिटी सर्वांचेच स्वप्न असते. नुकतीच म्हाडाने मुंबईतील ४०८२ घरांसाठी सोडत प्रक्रिया सुरु केली आहे. ताडदेव, जुहू, चेंबूर येथील कोट्यवधींच्या घरांसाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह आजी आणि माजी आमदारांनी लोकप्रतिनिधींच्या कोट्यातून अर्ज केले आहेत.

दुसरीकडे मुंबईत घर असूनही या २ टक्के राखीव जागांवरची घरे पदरात पडावी यासाठी लोकप्रतिनिधी खोटी कागदपत्रे सादर करतात. म्हाडा या अर्जांची पडताळणी सखोलपणे करताना दिसत नाही अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांनी केली आहे.

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि जालना जिल्ह्यातील भाजप आमदार नारायण कुचे यांनी ताडदेव येथील क्रिसेंट टॉवर, देगलूर बिलोलीचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी जुहू येथील, माजी आमदार हिरामण वरखेडे यांनी जुहू आणि चेंबूर येथील तर आमदार आमशा पडवी यांनी गोरेगाव पहाडी येथील म्हाडाच्या घरासाठी रितसर अर्ज केला आहे.

Dr. Bhagwat Karad
Mumbai Orange Alert : मुंबईला उदया पावसाचा ऑरेंज अलर्ट

महागडी घरे

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत यंदाच्या वर्षी सर्वाधिक म्हणजे ७ कोटींहुन अधिक किमतीची घरे विक्रीसाठी आहेत. यामध्ये सर्वात कमी किमतीचे अत्यल्प उत्पन्न गटातील घर २४ लाख किमतीचे असून ताडदेव येथील साडेसात कोटींचे उच्च उत्पन्न गटातील घर हे सर्वाधिक किमतीचे आहे.

माझं मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठेही घर नाहीये. आमदार, खासदारांसाठी राखीव असणाऱ्या कोट्यातून मी अर्ज सादर केला आहे. म्हाडाच्या घरासाठी ८५ टक्के गृहकर्ज मिळते. लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला अधिकार आहे. मुंबईत घर असं घेऊ शकत नाही म्हणून आता या लॉटरीत घर मिळेल अशी आशा आहे. म्हणून मी अर्ज भरला आहे.

- नारायण कुचे, आमदार

Dr. Bhagwat Karad
Mumabi News: कॉन्स्टेबलच्या धाडसाला सलाम; दोन चिमुकल्यांना समुद्रात बुडण्यापासून वाचवलं!

मी आमदार झाल्यानंतर म्हाडाची सरकारी योजनतेवून घर मिळतात अशी माहिती होती. म्हणून मी इथे अर्ज केला. सध्यातरी यादीत माझे नाव आहे. म्हाडावर विश्वास असल्याने मी अर्ज भरला. १५ जागा राखीव होत्या त्यात ४ जागांसाठी अर्ज आले आहेत. म्हणून मला खात्री वाटते आहे की मला या सोडतीत घर मिळेलच.

- आमशा पडवी, आमदार

म्हाडाच्या २ टक्के राखीव जागांवर घर मागण्याचा लोकप्रतिनिधीला अधिकार आहे. मात्र राहत्या गावांमध्ये या सर्वांचीच घरे आहेत. स्वतःची निवासी मालमत्ता असूनही घर घेणं हे नियमबाह्य आहे. मात्र खोटे शपथपत्र देत हे लोकप्रतिनिधी कोट्यातील घरे पदरात पडून घेतात. म्हाडा देखील सर्व नियम गुंडाळून या आजी माजी लोकप्रतिनीधी, मत्र्यांना कोट्यातून घरे देतात. हे निषेधार्ह आहे.

- नरसय्या आडम, ज्येष्ठ कामगार नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com