उरण : अतिप्रसंगाचा प्रयत्न?, भरधाव इको गाडीतून विद्यार्थीनीने घेतली उडी

एका १६ वर्षीय विद्यार्थीनीला इको चालकाने निर्जन ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थीनीने प्रसंगावधान दाखवत चालत्या इको गाडीतून उडी मारुन स्वत:चा बचाव केल्याची घटना सोमवारी घडली.
crime
crimesakal
Summary

एका १६ वर्षीय विद्यार्थीनीला इको चालकाने निर्जन ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थीनीने प्रसंगावधान दाखवत चालत्या इको गाडीतून उडी मारुन स्वत:चा बचाव केल्याची घटना सोमवारी घडली.

नवी मुंबई - उरण मधील फुंडे कॉलेज पासून खोपटे गाव येथे इको गाडीतून एकटीच जाण्यासाठी निघालेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थीनीला इको चालकाने निर्जन ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थीनीने प्रसंगावधान दाखवत चालत्या इको गाडीतून उडी मारुन स्वत:चा बचाव केल्याची घटना सोमवारी भरदुपारी घडली. यावेळी विद्यार्थीनीने आपल्या नातेवाईकांना मोबाईलवरुन इको चालकाची माहिती दिल्याने, संतफ्त झालेल्या इको चालकाने विद्यार्थीनीला बेदम मारहाण करुन तिच्या मोबाईल फोनचे नुकसान करुन पलायन केले. उरण पोलिसांनी या इको चालकाविरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

या घटनेतील १६ वर्षीय विद्यार्थीनी उरणच्या खोपटा भागात कुटुंबासह राहण्यास असून ती फुंडे कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत आहे. गत १ ऑगस्ट रोजी सकाळी सदर विद्यार्थीनी नेहमीप्रमाणे कॉलेजमध्ये गेली होती. त्यानंतर दुपारी ती कॉलेजमधुन सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी रस्त्यालगत रिक्षाची वाट पाहत उभी होती. यावेळी एकही प्रवासी नसलेल्या काळ्या पिवळ्या रंगाच्या एका इको गाडी चालकाने आपली गाडी थांबवल्यानंतर खोपटे गाव येथे जायचे आहे, असे सांगून सदर विद्यार्थीनी गाडीमध्ये बसली. यावेळी इको चालकाने गाडीमध्ये सीएनजी गॅस भरल्यानंतर खोपटे गाव येथे जाणार असल्याचे सांगून आपली गाडी फुंडे पेट्रोल पंपाच्या दिशेने घेतली. मात्र यावेळी इको चालकाने आपली गाडी पेट्रोल पंपाजवळ न नेता डाव्या बाजुला असलेल्या रस्त्यावर नेली.

यावेळी विद्यार्थीनीने पेट्रोल पंप दुसऱया रस्त्यावर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र इको चालकाने न ऐकल्यासारखे करुन गाडी पुढे नेली. त्यानंतर इको कार चालकाने सदर गाडी कच्च्या व निर्जन रस्त्यावर नेल्यानंतर विद्यार्थीनीने त्याला गाडी थांबविण्यास सांगितले, मात्र चालकाने तिचे ऐकले नाही. त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थीनीने आपल्या मोबाईलवरुन मामाला फोन केला, मात्र मामाने फोन उचलला नाही. त्यामुळे विद्यार्थीनीने भावाच्या मित्राला फोन लावुन इको कार चालक तिला फुंडे पेट्रोल पंपाजवळुन निर्जन ठिकाणी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर या विद्यार्थीनीने आपल्या भावाला देखील संपर्क साधुन त्याला सुद्धा या प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. यावेळी इको कार मुख्य रस्त्यापासून अर्धा किलो मीटर आत मध्ये असल्याने घाबरलेल्या सदर विद्यार्थीनीने इको कारचा दरवाजा उघडून चालत्या गाडीतून बाहेर उडी मारली.

याचवेळी विद्यार्थीनीच्या मोबाईलवर तिच्या मामाचा फोन आल्यानंतर विद्यार्थीनीने त्याला सदर प्रकाराची माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र इको चालकाने विद्यार्थीनीला जोरात धक्का देऊन खाली पाडले. यावेळी विद्यार्थीनीने फोनवरुन आरडा ओरड करुन आपल्या मामाला सांगण्याचा प्रयत्न केला असता, इको चालकाने तिच्याकडुन मोबाईल फोन खेचुन घेत जमीनीवर दोन-तीन वेळा आपटुन त्याचे नुकसान केले. त्यानंतर त्याने विद्यार्थीनीला मारहाण करत तिचे डोके जमीनीवर आपटले. त्यानंतर इको चालक आपली गाडी घेऊन सीमा शुल्क कर्मचारी कॉलनीकडे पळून गेला. या प्रकारानंतर घाबरलेल्या विद्यार्थीनीने मुख्य रस्त्याच्या दिशेने धाव घेत आपले घर गाठले. त्यानंतर या विद्यार्थीनीच्या कुटुंबियांनी उरण पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी इको चालकाविरोधात अपहरणासह मारहाण करणे आदी कलमासह गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com