मुंबई : विशेष मोहिमे अंतर्गत 55 हजारांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

ओळखपत्र नसलेले आणि अंथरुणाला खिळून असणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.
Mumbai
MumbaiSakal

मुंबई : महापालिकेच्या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 55,020 नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. यात स्तनदा माता, गर्भवती महिला, परदेशी जाणारे विद्यार्थी, शारीरिक व्यंग असणारे, ओळखपत्र नसलेले आणि अंथरुणाला खिळून असणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी, कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण हा एकमेव मार्ग आहे. मुंबईत 16 जानेवारीपासून लोकांना टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जात आहे, परंतु काही लोक असे आहेत ज्यांना लसीकरण करणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिकेने वेळीच विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे ज्याअंतर्गत लोकांच्या घरोघरी जाऊन ही लसीकरण केले जात आहे. दरम्यान, या श्रेणीतील 16, 461 नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण होऊन यांना कोरोनापासून संरक्षण मिळाले आहे.

Mumbai
मुंबईत कोरोनाचे आज 228 नवे रुग्ण: तर 3 रुग्णांचा मृत्यू

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत शहरातील 99 टक्के नागरिकांना पहिला डोस देत मुंबई लसीकरणात अव्वल आहे. कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी मुंबईत सामान्य लोकांसाठी लसीकरण मोहिम राबवली गेली. परंतु अशा अनेक लोकांसाठी एक विशेष मोहीम देखील सुरू केली आहे जेणेकरून ते लसीच्या रांगेत मागे राहू नयेत किंवा असे काही लोक असतील ज्यांना अजिबात लस मिळालीच नसेल. उदाहरणार्थ, नगरपालिकेने स्तनदा मातांसाठी मे महिन्याच्या अखेरीस लसीकरण मोहीम सुरु केली, त्यानंतर 31 मे रोजी अभ्यास आणि नोकरीसाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यानंतर, दिव्यांग आणि मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर, महानगरपालिकेच्या विशेष मोहिमेअंतर्गत गर्भवती महिला आणि अंथरुणाला खिळून असलेल्यांना लसीकरण केले जात आहे.

Mumbai
Nanded : पावणे तेरा लाख जणांनी घेतली कोरोना लस

मुंबई लसीकरण अधिकारी आणि उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप यांनी सांगितले की, कोणीही लसीपासून वंचित राहू नये हे आमचे ध्येय आहे. परदेशी जाणाऱ्या 31,784 नागरिकांना मिळाली सुरक्षा - मुंबईचे असे अनेक लाभार्थी आहेत, ज्यांना अभ्यास, नोकरी आणि इतर कामांमुळे परदेशात जावे लागते. त्याच लोकांना परदेशात प्रवेश आहे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. हे लक्षात घेता, महानगरपालिकेने एका विशेष मोहिमेअंतर्गत या वर्गासाठी लसीकरण सुरू केले. आतापर्यंत 31,784 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी, 27,822 जणांनी दोन्ही डोस घेतले आहे.

13034 स्तनदा मातांचे लसीकरण -

मुंबईत महानगरपालिकेने आतापर्यंत एका विशेष मोहिमेअंतर्गत 13034 स्तनदा मातांचे लसीकरण केले आहे. यापैकी 10,310 मातांनी पहिला डोस आणि 2714 ने दुसरा डोस घेतला आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या लसीकरणात लाभार्थीला रांगेत उभे न राहता त्वरित लसीकरण केले जाते. त्यामुळेच, आता या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

7037 दिव्यांग आणि मानसिक आजाराने ग्रस्त झाले सुरक्षित -

आतापर्यंत, विशेष मोहिमेअंतर्गत, महानगरपालिकेने 7037  दिव्यांग आणि मानसिक आजारांनी ग्रस्त लोकांना सुरक्षेचा डोस दिला आहे. यापैकी, 4,720 ला पहिला आणि 2317 ला लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या वर्गाच्या लोकांना केंद्रात आल्यावर लगेच लसीकरण केले जाते.

Mumbai
डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला बलात्कार

बेडरिडनचा ही वाढता प्रतिसाद-

बेडरिडन म्हणजेच अंथरुणाला खिळून असलेल्या नागरिकांसाठीही पालिकेने लसीकरण सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत या बेडरिडन रुग्णांची नोंद वाढली असून सुरुवातीला फक्त 4500 रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, आता 8,318 बेडरिडन रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 4,668 नागरिकांना पहिला आणि 3,650 नागरिकांना डोअर टू डोअर जाऊन लसीकरण केले गेले आहे. आतापर्यंत पालिकेतील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आणि आरोग्य सेविका यांच्या उपस्थितीत लसीकरण केले जात आहे.

पुरावा नसलेले, देह विक्री करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथींनाही लाभ -

मुंबईत असेही काही नागरिक आहेत ज्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही. काही वंचित वर्ग जसे की देह विक्री करणाऱ्या महिला , तृतीयपंथी. महानगरपालिकेने या लोकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू केली आहे. महानगरपालिकेने आतापर्यंत अशा एकूण 8,538 लोकांना लसीकरण केले आहे, त्यापैकी 5,662 जणांनी लसीचा पहिला आणि 2886 लोकांनी दोन्ही घेतले आहेत.

Mumbai
सांगली : जिल्हा बँकेचे पहिल्या दिवशी २३ जणांनी नेले ७२ अर्ज

2848 गर्भवतींना सुरक्षेचा डोस -

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेने गर्भवती महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीमही सुरू केली आहे. समुपदेशनापासून ते गर्भवती महिलांच्या लसीकरणापर्यंत त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत 2848 गर्भवतींना लसीकरण करण्यात आले आहे, त्यापैकी 1848 ने पहिला डोस घेतला आहे आणि 1002 गर्भवतींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. ही संख्या काही महिन्यांपूर्वी दोन अंकी होती. गर्भवतींच्या दुसऱ्या डोससाठीही चांगला प्रतिसाद असल्याचे पालिकेच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com