विरार : वसई-विरार महापालिकेच्या सातिवली येथील बालसंगोपन केंद्रात अप्रमाणित औषधांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती तसेच या प्रक्रियेत सहभागी असलेल्या पालिका अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती तथा शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी केली. या मागणीसंदर्भात सुदेश चौधरी यांच्या नेतृत्वात आज (1 जुलै) दुपारी शिवसेना शिष्टमंडळाने वसई-विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची भेट घेतली व निवदेन दिले.