Vidhan Sabha 2019 : दूरदर्शनने परस्पर बदलली काँग्रेसची स्क्रिप्ट; मुख्यमंत्र्यांवरील शब्द काढून टाकले

doordarshan changed congress script cm devendra fadnavis
doordarshan changed congress script cm devendra fadnavis

मुंबई : काँग्रेसच्या स्क्रिप्टमध्ये दूरदर्शनकडून परस्पर बदल करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचाच हा प्रकार असून, स्क्रीप्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी असलेला मजकूर कापण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

तोपर्यंत रेकॉर्डिंग करणार नाही
सरकारच्या दबावाखाली दूरदर्शन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असून, मतदानासाठी आवाहनाबाबत काँग्रेसच्या स्क्रिप्टमध्ये परस्पर बदल करण्यात आला आहे. दूरदर्शनचा हा प्रकार संतापजनक आहे. विरोधकांच्या संवैधानिक मतस्वातंत्र्याच्या अधिकारावर गदा आणणारा आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
सावंत म्हणाले, ‘दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी काँग्रेसने एक स्क्रिप्ट दिली होती. यात ‘गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थापा मारण्याशिवाय आणि खोटे बोलण्याशिवाय काही केलेले नाही’ हे शब्द छाननी समितीने वगळले आहेत. एखाद्या कार्यक्रमात मत व्यक्त करण्याचा विरोधीपक्षांना असलेल्या संवैधानिक अधिकारावरच दूरदर्शनने गदा आणली आहे. अशा पद्धतीने विरोधकांना मत व्यक्त करण्यापासून रोखण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. दूरदर्शनने काँग्रेसच्या स्क्रिप्टमधून ‘ते’ शब्द का वगळले, तसेच मुख्यमंत्री हे खरेच बोलतात असे लेखी द्यावे, तोपर्यंत रेकॉर्डिंग करणार नाही.’

विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न
‘सरकारच्या कारभारावर टीका करण्यापासून रोखण्याचा अधिकार दूरदर्शनला कोणी दिला? कोणाच्या दबावाखाली दूरदर्शन विरोधकांना मुख्यमंत्र्यांविरोधात बोलण्यापासून रोखत आहे? हे स्पष्ट झाले पाहिजे. दूरदर्शन फक्त सरकारी आवाजाचे व्यासपीठ आहे का?’ असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com