विकास सचदेवा उच्च न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात अपील

मुंबई ः विमानात अल्पवयीन अभिनेत्रीचा विनयभंग केल्याच्या आरोपात विकास सचदेवा हा व्यावसायिक दोषी ठरला होता. त्याने तीन वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेविरोधात आता उच्च न्यायालयात अपील केले आहे.

 प्रकल्पग्रस्त आक्रमक

तीन वर्षांपूर्वी एअर विस्तारा कंपनीच्या विमानातून दिल्ली-मुंबई प्रवासादरम्यान विकास सचदेवा याने या अल्पवयीन अभिनेत्रीशी गैरवर्तन केले आणि तिचा विनयभंग केला, असा आरोप होता. या अभिनेत्रीने त्या प्रकाराबाबतची पोस्ट समाज माध्यमावर व्हिडीओसह प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पोलिसांनी सचदेवाविरोधात गुन्हा दाखल केला होता.

एवढ्याशा वयातही दिली मृत्यूशी झुंज

विशेष न्यायालयाने त्याला ‘पॉक्‍सो’ (लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण) कायद्यासह भारतीय दंड विधानातील कलम क्र. ३५४ (विनयभंग) नुसार दोषी ठरवून तीन वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे. त्याविरोधात अपील करण्यासाठी तूर्तास त्याची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. सध्या जामिनावर असलेल्या सचदेवाने उच्च न्यायालयात केलेल्या अपील याचिकेत आरोपांचे खंडन केले आहे. त्याच्या अपीलावर २ मार्चला सुनावणी होण्याची शक्‍यता आहे.

Vikas Sachdeva in the High Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Sachdeva in the High Court